आंबोली पाणलोट समितीत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार

अध्यक्ष मयत असताना त्यांच्या करण्यात आल्या स्वाक्षरी;या विरोधात उपोषण करण्याचा शिवसेना तालुका प्रमुख राऊळ यांचा इशारा

⚡सावंतवाडी ता.२२-: आंबोली पाणलोट समिती मध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असून, अध्यक्ष मयत असताना देखील अध्यक्षांच्या नावाने सह्या झाला असल्याचा आरोप शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी केला असून, दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी रुपेश राऊळ आणि या भ्रष्टाचार विरोधात उपोषणास बसलेल्या उपोषणकर्त्यांनी केली आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की पाणलोट समिती आंबोली यांनी मर्जीतील लोकांना योजनेत समाविष्ट करून गरजू व गरीब लोकांना वंचीत ठेवून २२२ लाभार्थ्यांना लाभ दिला. यातील ८० टक्के लोकांचे उद्योग धंदे अस्तित्वात नसून ११२ जणांची नावे प्रतिक्षा यादीत आहे. शासनाचे निकष डावलून लोकप्रतिनिधी, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी यांनी योजनेचा लाभ घेतल्यान त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी करत उपोषणकर्ते सुनील चव्हाण यांनी दुसऱ्यांदा तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर उपोषण छेडले. दरम्यान, शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी या उपोषणाला पाठिंबा दिला. यावेळी आंबोली ग्रामपंचायत व कृषी अधिकारी यांच्यात ग्रामसभा व ठरावाबद्दल नसलेलं एकमत, दिसून येणारा घोळ पाहता अधिकाऱ्यांसह संबंधित संजीवनी संस्थेच्या पदाधिकाऱ्याला धारेवर धरले.

तर त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली. तर आंबोली पाणलोट समितीत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झालाय. तर अध्यक्ष मयत असताना सह्या झाल्याचा आरोप शिवसेना तालुका प्रमुख रूपेश राऊळ यांनी केला. याबाबत कृषी अधिकारी यांना विचारणा केली असता त्यावर भाष्य करणं त्यांनी टाळल. यावेळी उप जिल्हा प्रमुख चंद्रकांत कासार, बाळा गावडे, गुणाजी गावडे आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page