कणकवली पोलीस ठाण्यातर्फे सेवानिवृत्त पोलीस पाटील यांचा सत्कार

⚡कणकवली ता.२२-: कणकवली पोलीस ठाण्याच्या वतीने सन्मानपत्र देऊन पोलीस पाटील कासम इब्राहिम शेख ( साकेडी ) व दिलीप गणपत साटम (आयनल) यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे, पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर, सहा.पोलीस निरीक्षक सागर खंडागळे, पोलीस उपनिरीक्षक राजकुमार मुंडे, पोलीस कॉन्स्टेबल किरण मेथे, पोलीस कॉन्स्टेबल सागर मासाळ आदी उपस्थित होते.

गावपातळीवर गावातील कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात ठेवण्यासाठी त्या – त्या गावात ग्रामस्तरावर पोलीस पाटील नेमला जातो. गावात घडणाऱ्या घडामोडी आणि कायदा व सुव्यवस्था राखणे तसेच गावात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी हा पोलीस नेहमीच सतर्क असतो. एका कर्तव्यदक्ष पोलीसाप्रमाणे पोलीस पाटील हा काम करत असतो. मात्र अशा व्यक्तींचा सन्मान हा स्थानिक पातळीवर होताना फार कमी प्रमाणत दिसून येते. परंतु कणकवली पोलीस ठाणे मागील काही वर्षांपासून तालुक्यातील गावा – गावातील पोलीस पाटील यांचे सन्मानपत्र देऊन त्यांचा सत्कार करते.कायदा व सुव्यवस्था ही त्या त्या पातळीवर सुस्थितीत राहण्यासाठी एका कर्तव्यदक्ष व्यक्तीची गरज असते.

You cannot copy content of this page