Headlines

यशवंतराव भोसले सैनिक स्कूलच्या विद्यार्थी व शिक्षकांचा गौरव…

सीबीएसई बोर्डातील यश व शैक्षणिक योगदानाची दखल..

⚡सावंतवाडी ता.२८-: कॉम्प्लेक्स कोल्हापूरच्या वतीने संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल, अतिग्रे येथे आयोजित ‘सीबीएसई टॉपर सत्कार सोहळा २०२६’ मध्ये यशवंतराव भोसले सैनिक स्कूलच्या विद्यार्थी व शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.

सीबीएसई दहावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केल्याबद्दल शाळेचा विद्यार्थी सहर्ष सतीश धुमाळे याचा गौरव करण्यात आला. तसेच शिक्षिका दीपिका रुपेश कदम यांना ‘सर्वोत्कृष्ट शिक्षक पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. इयत्ता दहावीच्या समन्वयक सोनाली अक्षय शेट्टी व मुख्याध्यापिका प्रियांका शशिकांत देसाई यांचाही शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाला सांगलीचे जिल्हाधिकारी मैनाक घोष, मिरजचे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रणील गिल्डा तसेच सहोदय कॉम्प्लेक्स कोल्हापूरच्या अध्यक्षा सस्मिता मोहंती यांची प्रमुख उपस्थिती होती. या यशाबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत भोसले, अध्यक्षा ऍड.अस्मिता सावंतभोसले, सचिव संजीव देसाई यांनी विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

You cannot copy content of this page