⚡कणकवली ता.२८-: सातारा लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार मा. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज यांची कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी सदिच्छा भेट घेतली.
या भेटीदरम्यान विविध सामाजिक, विकासात्मक तसेच जनहिताच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. जिल्ह्यातील विकासकामे, स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित बाबी आणि भविष्यातील विविध उपक्रमांबाबत सकारात्मक संवाद झाला. यावेळी परस्पर सहकार्याची भावना व्यक्त करत विकासाला गती देण्यासाठी एकत्रितपणे प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
ही सदिच्छा भेट सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडली असून, उपस्थितांनी या भेटीचे स्वागत केले.
