हिंदी भाषेचा प्रचार व प्रसार केला पाहिजे- प्रा. डॉ. देविदास बोर्डे

⚡मालवण ता.२२-: भारतात हिंदी भाषा जास्त लोक बोलू शकतात, म्हणूनच या भाषेला राष्ट्रभाषा म्हणून निवडण्यात आले. हिंदी भाषेचा प्रचार व प्रसार केला पाहिजे असे प्रतिपादन पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडीचे प्रा. डॉ. देविदास बोर्डे यांनी येथे बोलताना केले.

मालवण येथील सिंधुदुर्ग महाविद्यालयात हिंदी भाषा दिन सप्ताह संपन्न झाला. या सप्ताहाचा समारोपाचा कार्यक्रम गुरुवारी महाविद्यालयात पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन सरस्वतीच्या प्रतिमेस प्रा. डॉ. देविदास बोर्डे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. यावेळीव्यासपीठावर स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या प्राचार्या. डॉ. उज्वला सामंत, हिंदी विभागाध्यक्ष प्रा. हंबीरराव चौगले, प्रा. चौगुले सर, प्रा. अन्वेशा कदम उपस्थित होते. प्रा. हंबीरराव चौगले यांनी मान्यवरांचे स्वागत करून प्रास्ताविक केले.

सिंधुदुर्ग महाविद्यालयात हिंदी सप्ताह उत्तम रितीने साजरा होऊन यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा घेण्यात आल्या बद्दल प्रा. डॉ. बोर्डे यांनी कौतुक केले. यावेळी बोर्डे यांनी विष्णू सस्केना यांची एक कविता हिंदी मध्ये सादर केली. तर मराठी हिंदी या दोन भाषा बहिणी बहिणी आहेत, त्यामुळे प्रत्येकाचे या दोन्ही भाषांवर प्रेम असले पाहिजे, हिंदी विभाग मधील प्राध्यापक व विद्यार्थी यांनी उत्तमरीत्या कार्यक्रमांचे आयोजन करून त्यात सहभागी विद्यार्थ्यांनी दिलेला प्रतिसाद खूप महत्त्वाचा आहे, असे यावेळी प्राचार्या डॉ. उज्वला सामंत यांनी सांगितले. यावेळी विद्यार्थ्यांनी देखील आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयाचा विद्यार्थी ओंकार यादव याने केले तर आभार प्रा. अन्वेशा कदम यांनी मानले.

हिंदी भाषा सप्ताह निमित्त महाविद्यालयात घेण्यात आलेल्या स्पर्धांमधील विजेत्यांना यावेळी प्रशस्तीपत्रक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. यामध्ये शुद्धलेखन स्पर्धा- प्रथम क्रमांक – दिपीका ज्ञानेश्वर चव्हाण, द्वितीय क्रमांक – सचिन खरात, तृतीय क्रमांक – मनाली राजेंद्र तांबे, निबंध स्पर्धा- प्रथम क्रमांक – कुणाल केळुसकर, द्वितीय क्रमांक – महेश गोसावी, तृतीय क्रमांक – यश पारकर, काव्यापाठ स्पर्धा- प्रथम क्रमांक – सुहाना मालपेकर, द्वितीय क्रमांक – मेहेक शेख, तृतीय क्रमांक- ओंकार यादव, रांगोळी स्पर्धा- प्रथम क्रमांक – कुणाल केळुसकर, द्वितीय क्रमांक – दिव्या चव्हाण, तृतीय क्रमांक – तेजस कातवणकर, वाचन स्पर्धा – प्रथम क्रमांक – महेश गोसावी, द्वितीय क्रमांक – गायत्री आरोलकर, तृतीय क्रमांक – तेजस गोसावी या विजेत्यांना गौरविण्यात आले.

You cannot copy content of this page