जिल्ह्यात १२० ठिकाणी सार्वजनिक नवरात्रोत्सव

२२ ठिकाणी होणार खाजगीरित्या दुर्गामातेची प्रतिष्ठापणा

सिंधुदुर्गनगरी ता.२२-: जिल्ह्यात गणेशोत्सवानतर आता येत्या २६ सप्टेम्बर पासून नवरात्रोत्सवाला प्रारंभ होत आहे, जिल्ह्यात १२० ठिकाणी सार्वजनिक तर ३२ ठिकाणी खाजगी दुर्गा मातेची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. यानिमित्त जिल्ह्यात सार्वजनिक मंडळातर्फे जय्यत तयारी सुरु झाली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरु झाली असून येत्या २६ सप्टेंबर पासून नवरात्रोत्सवाला सुरुवात होणार आहे.
नवरात्री उत्सव धूम धडाक्यात शांततेत पार पडावा यादृष्टीने जिल्हा पोलीस प्रशासन यंत्रणेने आवश्यक त्या उपाययोजना आखल्या आहेत. सोमवार २६ सप्टेंबर घटस्थापने पासून विधिवत नवरात्र उत्सवाला प्रारंभ होणार आहे, यानिमित्त सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळे, तसेच विविध मंदीरे तसेच खाजगी घरांमध्ये दुर्गा स्थापने निमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. त्याचबरोबर या उत्सवानिमित्त भजन, फुगड्या ,रास दांडिया ,नृत्य, रासक्रीडा, वेशभूषा, आदि स्पर्धाचे आयोजन करण्यात येते. विविध धार्मिक ,सांस्कृतिक, सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात येते.
गेले दोन वर्षात कोरोणा महामारी मुळे काही अंशी या उत्सवावर विरजण पडले होते, शासनाने घालून दिलेल्या नियमांचे बंधन पाळणे आणि त्यादृष्टीने ऑनलाइन पद्धतीने किंवा नियमनाचे बंधन पाळून नवरात्र दुर्गा मातेचा उत्सव साजरा करताना रासक्रीडा, दांडिया, नृत्य,साजरा करताना गर्दीचे कार्यक्रम टाळण्यात आले होते. यावर्षी शासनाने नवरात्र उत्सवा साठी ही बंधने दूर केली असून गणेशोत्सवानंतर आता नवरात्र उत्सवाची धूम या वर्षी चांगलीच रंगणार असल्याचे दिसून येत आहे, जिल्हात ठिकाणीसार्वजनिक दुर्गा मातेच्या स्थापनेसाठी सार्वजनिक मंडळामार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन आणि दुर्गादेवीच्या स्थापनेची तयारी सुरू झाली आहे. जिल्ह्यात १२० ठिकाणी सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळातर्फे दुर्गादेवीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे, यामध्ये दोडामार्ग८, बांदा ८, सावंतवाडी १५, कुडाळ १४, वेंगुर्ले१०, निवती५, सिंधुदुर्गनगरी ४, मालवण १४ आचरा४, देवगड १०, विजयदुर्ग६, कणकवली१३, वैभव वाडी ९ आदी ठिकाणी दुर्गादेवीची प्रतिष्ठापना सार्वजनिक रित्या करण्यात येणार आहे, याशिवाय जिल्ह्यात दोडामार्ग ४, वेंगुर्ले ४, कुडाळ २,मालवण ६ विजयदुर्ग १, सिंधुदुर्गनगरी१, देवगड८,;सावंतवाडी ६ आदी ३२ दुर्गादेवीची खाजगीरित्या स्थापना होणार आहे,अशी माहिती पोलिस प्रशासनाकडून देण्यात आली.

You cannot copy content of this page