जिल्हा परिषद कृषी विभाग करणार ८३ लाख खर्च

२०२२-२३ साठी नियोजन

सिंधुदुर्गनागरी ता २२
जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत सन २०२२-२३ मध्ये राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांसाठी ८३ लाख निधीची अंदाजपत्रकात तरतूद करण्यात आली आहे. या निधीतून जिल्ह्यातील सुमारे १३६७ हुन अधिक लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ दिला जाणार आहे. त्यासाठी पात्र लाभार्थींकडून २८ सप्टेंबर पर्यंत प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.तर २ ऑक्टोबर रोजी प्राप्त प्रस्तावाना मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यामार्फत मंजुरी देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषद कृषी अधिकारी सुधीर चव्हाण यांनी आज दिली.

जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांसाठी सन २०२२- २३ साठी ८३ लाख निधीची तरतूद करण्यात आली असून या योजनांचा लाभ जिल्ह्यातील जास्तीत जास्त लाभार्थी शेतकऱ्यांना मिळावा. यासाठी २८ सप्टेंबर पर्यंत सर्व योजनांसाठी प्रस्ताव मागविण्यात आले आहेत .
जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या ५० टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना कीटकनाशके पुरवणे योजनेसाठी २ लाख निधीची तरतूद, पोर्टेबल पावर स्पेअर योजनेसाठी १० लाख तरतूद, नॅपसॅक स्पेअर पुरवणे २ लाख, ग्रास कटर पुरवणे ४२ लाख, प्लास्टिक ताडपत्री पुरवणे ५ लाख, प्लास्टिक क्रेट पुरवणे ३ लाख, नारळ शिडी पुरवणे २ लाख, डिझेल इंजिन पुरवणे ४ लाख, विद्युत पंप पुरवणे ८ लाख ,पीव्हीसी पाईप पुरवणे ३ लाख, तर वनव्यामुळे फळबाग नुकसान अर्थसहाय्य या योजनेसाठी २ लाख निधीची तरतूद करण्यात आली आहे. अशा प्रकारे जिल्हा परिषद कृषि विभागा मार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांसाठी ८३ लाख निधीची तरतूद करण्यात आली आहे. या सर्व योजनांचा जिल्ह्यातील १३६७ हून अधिक पात्र लाभार्थ्यांना लाभ दिला जाणार आहे. तर या योजनांचा लाभ देताना कोरोना बाधित मृत व्यक्तींच्या वारसदारांना प्राधान्य दिले जाणार आहे. त्यासाठी मिशन वासल्य योजना कार्यान्वित करण्यात आली आहे .तरी जिल्ह्यातील शेतकरी लाभार्थ्यांनी जिल्हा परिषद कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी विहित नमुन्यात, आवश्यक दखले व कागदपत्राच्या पुर्ततेसह २८ सप्टेंबर पूर्वी आपले प्रस्ताव सादर करावेत. असे आवाहन जिल्हा परिषद कृषी अधिकारी सुधीर चव्हाण यांनी केले आहे.

You cannot copy content of this page