Headlines

देवगड येथे २६ मे रोजी शासन आपल्या दारी व कृषी महोत्सवाचे आयोजन

⚡देवगड ता.२४-: मुख्यमंत्री शासकीय योजना नूतनीकरण अभियानांतर्गत ‘शासन आपल्या दारी ‘या कार्यक्रमाचे आयोजन महसूल विभाग तहसीलदार कार्यालय देवगड यांच्या वतीने शुक्रवार दि.२६ मे २०२३ रोजी स.१० ते सायंकाळी ५ या वेळेत सांस्कृतिक भवन जामसंडे या ठिकाणी करण्यात आले आहे.या कार्यक्रमाअंतर्गत आयोजित केलेल्या शिबिराचे उदघाटन आम.नितेश राणे यांच्या हस्ते उपविभागीय अधिकारी जगदीश कातकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार…

Read More

मालवणात भाजपतर्फे ‘केरला स्टोरी’चे मोफत शो

⚡मालवण ता.२४-: भाजपचे प्रदेश सचिव माजी खासदार नीलेश राणे व प्रदेश कार्यकारिणी सदस्य दत्ता सामंत यांच्या संकल्पनेतून मालवण तालुका भाजपतर्फे दि. ४ जून रोजी मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृह येथे पडद्यावर ‘द केरला स्टोरी’ या सिनेमाचे मोफत शो आयोजित करण्यात आले आहेत. दि. ४ जून रोजी सकाळी ११ वाजता, दुपारी ३ वाजता, ७ वाजता हे…

Read More

आंबेरीतील बेकायदा वाळू उत्खननप्रकरणी चौघे निर्दोष

⚡मालवण ता.२४-: आंबेरी येथील बेकायदेशीर वाळू उत्खननप्रकरणी चौके येथील राजन शशिकांत गावडे, संजय बाळकृष्ण डिचोलकर, प्रकाश निळकंठ तावडे, लक्ष्मण चंद्रकांत तावडे यांची मालवण न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. संशयित आरोपींतर्फे अॅड. स्वरूप नारायण पई व अॅड. अंबरिश गावडे यांनी काम पाहिले. जिल्हाधिकारी यांचा वाळू उत्खनन मनाई आदेश असताना व लिलाव प्रक्रिया बंद असताना आंबेरी येथील खाडी…

Read More

स्वनिधितून १५ जून पूर्वी शिक्षक उपलब्ध करा

अन्यथा जिल्हाभर आंदोलने:आ वैभव नाईक, सतीश सावंत यांचा इशारा सिंधुदुर्गनगरी ता २४शिक्षण मंत्र्यांच्या जिल्ह्यात रिक्त पदांमुळे शिक्षण क्षेत्राची वाताहत लागली आहे. १२१ शाळा शिक्षक नसल्याने बंद होणार आहेत. तर अन्य ५०० हून अधिक मोठ्या पटसंख्येच्या शाळेमध्ये एक-दोन शिक्षकच कार्यरत राहिले आहेत. याचा त्या शाळेच्या पटसंख्येवर परिणाम होणार आहे. तरी जिल्हा परिषद स्व निधीतून तात्पुरत्या स्वरूपात…

Read More

असलदेत वृद्धांशी भेटीचा असाही आदर्श

ॲड.अग्नीवेश तावडे यांनी वाढदिवस केला साजरा ⚡कणकवली ता.२४-: असलदे येथील दिविजा वृद्धाश्रमात विविध प्रकारच्या देणग्या, वस्तू आदी दानशूर लोक देत असतात मात्र याबरोबरच या वृद्धांसाठी काही वेळ गप्पा मारण्यासाठीही वेळ द्या, असे आवाहन करण्यात येते. याच अनुषंगाने कणकवलीतील युवा वकील अग्नीवेश तावडे यांनी मंगळवारी असलदे वृद्धाश्रमाला भेट देत तेथील वृद्धांशी गप्पाही मारल्या. ॲड. अग्नीवेश विजय…

Read More

पाडलोसमध्ये पाण्यासाठी अधिकाऱ्यांना घेराव

धोरण बद्दलल्याची कल्पना न दिल्याने शेतकऱ्यांचे नुकसान : जुन्या सर्वे प्रमाणे काम करण्याची मागणी ⚡बांदा ता.२४-: तिलारी धरणाच्या बांदा शाखा कालव्याचे काम पाडलोस सीमाभागापर्यंत आले. जुन्या सर्वे प्रमाणे सदर कालवा पाडलोस गावातून केणीवाड्याच्या दिशेने जात होता. परंतु बदलत्या धोरणामुळे सद्यस्थितीत कालवा मडुरा गावात पाईपलाईनद्वारे पोचला. नकाशात असा अचानक बदल कोणत्या कारणावरून झाला असा आरोप ग्रामस्थांनी…

Read More

मनविसेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

सिंधुदुर्ग मनविसे जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार यांची संकल्पना ⚡सावंतवाडी ता.२४-: महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित राज ठाकरे यांचा वाढदिवस महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने म.न.वि.से जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार यांच्या संकल्पनेतून उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी इन्सुली येथील एसुस आश्रमात भेटवस्तू तसेच खाऊ वाटप करण्यात आले व तुळस येथील गोवर्धन मंदिर येथे मनसेच्या वतीने सोलर स्ट्रीट…

Read More

बाल शिवाजी इंग्लिश मिडीअम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे तायक्वांदो ब्लॅक बेल्ट परीक्षेत यश

⚡कणकवली ता.२४-: बाल शिवाजी इंग्लिश मिडीअम स्कूल कणकवलीच्या कु. तनिष्का संदीप सावंत (इ. 8 वी) व कु. कुणाल निलेश नारकर (इ.10 वी) या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम रत्नागिरी येथे 21 मे 2023 ते 24 मे 2023 या कालावधीत आयोजित केलेल्या तायक्वांदो ब्लॅक बेल्ट परीक्षेत भरघोस यश संपादन केले आहे. ही परीक्षा तायक्वांदो फेडरेशन ऑफ…

Read More

डाॅ. एवळे यांना सावंतवाडीत पुन्हा आणा..

सुरेश भोगटे व विलास जाधव यांची मागणी ⚡सावंतवाडी ता.२४-: निवृत्त होणाऱ्या स्त्री रोग तज्ञ डॉक्टर ज्ञानेश्वर दुर्भाटकर यांच्या जागी डॉ. एवळे यांना नियुक्ती द्या अशी मागणी सावंतवाडीचे माजी आरोग्य सभापती सुरेश भोगटे व माजी नगरसेवक विलास जाधव यांनी केली आहे. येत्या ३१ मे रोजी उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रसूती विभागाचे डॉक्टर रूपाटकर हे निवृत्त होत आहेत त्यामुळे…

Read More

सिंधूरत्न योजनेतून गतिमान यांत्रिकीकरण योजना राबविणार

इच्छुकांनी प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन ⚡वेंगुर्ला ता.२४-: येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्र आणि कृषी संशोधन केंद्र – फोंडाघाट येथे सिधुरत्न समृद्धी योजनेंतर्गत भात, ऊस, आंबा, काजू, नारळ, सुपारी, मसाला, बांबू इत्यादी पिकांच्या गतिमान यांत्रिकीकरणासाठी कृती आरखडा ही योजना जून २०२३ पासून पुढील तीन वर्षासाठी सिधुदुर्ग जिल्ह्यामध्ये राबविण्यात येत आहे. या योजनेमध्ये सहभागी होणा-या…

Read More
You cannot copy content of this page