पाडलोसमध्ये पाण्यासाठी अधिकाऱ्यांना घेराव

धोरण बद्दलल्याची कल्पना न दिल्याने शेतकऱ्यांचे नुकसान : जुन्या सर्वे प्रमाणे काम करण्याची मागणी

⚡बांदा ता.२४-: तिलारी धरणाच्या बांदा शाखा कालव्याचे काम पाडलोस सीमाभागापर्यंत आले. जुन्या सर्वे प्रमाणे सदर कालवा पाडलोस गावातून केणीवाड्याच्या दिशेने जात होता. परंतु बदलत्या धोरणामुळे सद्यस्थितीत कालवा मडुरा गावात पाईपलाईनद्वारे पोचला. नकाशात असा अचानक बदल कोणत्या कारणावरून झाला असा आरोप ग्रामस्थांनी केला.

तसेच जुन्या सर्वेप्रमाणे शेतकऱ्यांच्या शेतात रोवलेले निस आजपर्यंत तसेच आहे. त्यामुळे अनेक वर्षांची नुकसान भरपाई देण्याची मागणी संबंधित शेतकऱ्यांनी केली. पाण्यासाठी आम्हाला आंदोलन करावे लागेल असे असे सांगत तिलारी कालवा उपअभियंता संतोष कविटकर यांना ग्रामस्थांनी धारेवर धरले. तसेच समर्प उत्तर न दिल्याने कार्यकारी अभियंता यांनाच पाडलोसमध्ये बोलवा अशी मागणी तहानलेल्या ग्रामस्थांनी केली.
पाडलोस केणीवाडापर्यंत जाणाऱ्या कालव्याच्या भागाची पाहणी करण्यासाठी उपकार्यकारी अभियंता संतोष कविटकर व सहकारी पाडलोस मध्ये आले होते. यावेळी तहानलेल्या ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्तीच केली. यावेळी बागायतदार आनंद कुबल, गोपाळ करमळकर, पाडलोस उपसरपंच राजू शेटकर, तंटामुक्ती समिती अध्यक्ष मधुकर परब, शेतकरी आनंद गावडे, हर्षद परब, अमोल नाईक, पप्पू कुबल, तुळशीदास नाईक, राजा पटेकर, चंद्रकांत सातार्डेकर, रोहन परब आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
दरम्यान, प्रवाही पद्धतीने जेथेपर्यंत पाणी जाईल त्या भागातील लाभार्थी शेतकऱ्यांना पाणी नक्कीच मिळणार. पाण्यापासून कोणीही वंचित राहू नये यासाठी आम्ही पुरेपूर प्रयत्न करून जास्तीत जास्त क्षेत्र ओलिताखाली आणणार असल्याचे आश्वासन उपकार्यकारी अभियंता संतोष कविटकर यांनी दिले व केणीवाडा भागाची पाहणी केली. हर्षद परब व गौरेश पटेकर यांनी केणीवाड्यातील पाण्याची परिस्थिती सांगितली.

You cannot copy content of this page