असलदेत वृद्धांशी भेटीचा असाही आदर्श

ॲड.अग्नीवेश तावडे यांनी वाढदिवस केला साजरा

⚡कणकवली ता.२४-: असलदे येथील दिविजा वृद्धाश्रमात विविध प्रकारच्या देणग्या, वस्तू आदी दानशूर लोक देत असतात मात्र याबरोबरच या वृद्धांसाठी काही वेळ गप्पा मारण्यासाठीही वेळ द्या, असे आवाहन करण्यात येते. याच अनुषंगाने कणकवलीतील युवा वकील अग्नीवेश तावडे यांनी मंगळवारी असलदे वृद्धाश्रमाला भेट देत तेथील वृद्धांशी गप्पाही मारल्या.

ॲड. अग्नीवेश विजय तावडे यांनी मंगळवारी आपल्या वाढदिवशी घरी कुटुंबासमवेत वाढदिवस साजरा करण्यापेक्षा असलदे येथील वृद्धाश्रमाला भेट दिली. यावेळी त्यांनी वृद्धांना फळे, खाऊ आदी भेटी दिली. यावेळी कु. आर्यन तावडेही उपस्थित होते. वृद्धाश्रमातील वृद्धांनीही यावेळी आत्मियतेने गप्पा मारल्या. ॲड. तावडे याचा यावेळी रोपटे देऊन सत्कार करण्यात आला. ॲड. तावडे यांच्या या कार्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.

You cannot copy content of this page