Headlines

सावंतवाडीतील ज्येष्ठ उद्योजक रामचंद्र पांगम यांचे निधन…

⚡सावंतवाडी ता.०९-: सावंतवाडी उभाबाजार येथील प्रसिद्ध व्यावसायिक तथा वैकुंठ रामा पांगम बेकरीचे मालक रामचंद्र वैकुंठ पांगम (81) यांचे अल्पशा आजाराने गोवा येथील रूग्णालयात गुरूवारी दुपारी निधन झाले.त्यांच्या निधनाने सावंतवाडीतील व्यापारी वर्गात हळहळ व्यक्त केली जात आहे.
​रामचंद्र पांगम हे गेल्या अनेक वर्षांपासून व्यावसायिक क्षेत्रात सक्रिय होते. आपल्या मनमिळाऊ आणि व्यापारी वृत्तीमुळे त्यांनी सावंतवाडीत एक वेगळा स्नेह निर्माण केला होता. मात्र मागील काहि दिवसापासून ते आजारी होते त्याच्यावर गोवा येथील रूग्णालयात उपचार सुरू होते त्यातच त्याचे आज निधन झाले त्याच्या पश्चात दोन भाऊ, मुले, मुलगी, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.सावंतवाडीतील नामांकित ‘नाव्हेल्टी ट्रेडर्स’चे मालक प्रकाश पांगम आणि रमाकांत पांगम यांचे बंधू, तर विश्वेष पांगम इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर विनीत पांगम यांचे ते वडील होत.

फोटो : रामचंद्र पांगम

You cannot copy content of this page