डाॅ. एवळे यांना सावंतवाडीत पुन्हा आणा..

सुरेश भोगटे व विलास जाधव यांची मागणी

⚡सावंतवाडी ता.२४-: निवृत्त होणाऱ्या स्त्री रोग तज्ञ डॉक्टर ज्ञानेश्वर दुर्भाटकर यांच्या जागी डॉ. एवळे यांना नियुक्ती द्या अशी मागणी सावंतवाडीचे माजी आरोग्य सभापती सुरेश भोगटे व माजी नगरसेवक विलास जाधव यांनी केली आहे.

येत्या ३१ मे रोजी उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रसूती विभागाचे डॉक्टर रूपाटकर हे निवृत्त होत आहेत त्यामुळे या ठिकाणी प्रसूतीसाठी येणाऱ्या रुग्णांची हेळसांड होणार आहे. डॉक्टर एवळे यांची नियुक्ती ही सावंतवाडी रुग्णालयात करण्यात आली होती मात्र दोडामार ग्रामीण रुग्णालयातील गैरसोय लक्षात घेता त्यांना तात्पुरती नियुक्ती त्या ठिकाणी देण्यात आली होती त्यामुळे डॉक्टर एवळे हे सावंतवाडी साठी नियुक्त असल्याने त्यांना पुन्हा या ठिकाणी देण्यात यावे व येथील गैरसोय दूर करावी त्यांना सावंतवाडीत आणण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण स्थानिक आमदार व शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचीही भेट घेणार असल्याचे श्री भोगटे व श्री जाधव यांनी म्हटले आहे.

You cannot copy content of this page