सिंधूरत्न योजनेतून गतिमान यांत्रिकीकरण योजना राबविणार

इच्छुकांनी प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

⚡वेंगुर्ला ता.२४-: येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्र आणि कृषी संशोधन केंद्र – फोंडाघाट येथे सिधुरत्न समृद्धी योजनेंतर्गत भात, ऊस, आंबा, काजू, नारळ, सुपारी, मसाला, बांबू इत्यादी पिकांच्या गतिमान यांत्रिकीकरणासाठी कृती आरखडा ही योजना जून २०२३ पासून पुढील तीन वर्षासाठी सिधुदुर्ग जिल्ह्यामध्ये राबविण्यात येत आहे. या योजनेमध्ये सहभागी होणा-या शेतकरी प्रशिक्षणार्थींना दोन महिन्यांचे प्रशिक्षण देण्यात येणार असून यात जास्तीत जास्त शेतक-यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

  इच्छुक शेतकरी प्रशिक्षणार्थींनी प्रशिक्षणामध्ये सहभाग घेण्याकरीता सहयोगी संशोधन संचालक, प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला किवा कृषि विद्यावेत्ता, कृषी संशोधन केंद्र फोंडाघाट, कणकवली यांच्या कार्यालयात ५ जूनपर्यंत आपली नावनोंदणी करावी.
You cannot copy content of this page