भंडारी पतसंस्था अध्यक्षपद बाबली वायंगणकर

उपाध्यक्षपदी अंकिता बांदेकर:पंचवार्षिक निवडणूक झाली होती बिनविरोध

⚡वेंगुर्ला ता.२४-: सिधुदुर्ग भंडारी सहकारी पतपेढी मर्यादित वेंगुर्ला या पतपेढीची वार्षिक निवडणूक बिनविरोध झाली असून चेअरमनपदी बाबली वायंगणकर तर व्हाईस चेअरमनपदी अंकिता बांदेकर यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.

  सन २०२२-२३ ते २०२७-२८ या पंचवार्षिक कालावधीसाठी पतपेढीची निवडणूक जाहीर झाली होती. मात्र, सर्वांच्या सहकार्याने ही निवडणूक बिनविरोध करण्यात आली. निवडणूक प्रक्रिया आणि चेअरमन तसेच व्हाईचे चेअरमन निवड सहकार अधिकारी प्रशांत साळगांवकर यांच्या उपस्थितीत पार पडली. संचालक मंडळावर संचालक म्हणून रमेश नार्वेकर, श्रीकृष्ण पेडणेकर, प्रकाश गडेकर, नंदन वेंगुर्लेकर, समाधान बांदवलकर, सारिका काळसेकर, जयराम वायंगणकर, जगन्नाथ डोंगरे यांची बिनविरोध निवड झाली आहे. निवड प्रक्रियेनंतर पतपेढीच्या मॅनेजर अनिता रेडकर, सुस्मिता परब, मेघना राऊळ, हेमंत साळगांवकर यांनी सर्वांचे अभिनंदन केले.

  दरम्यान, पतपेढीची स्थापना १९ मार्च १९९४ साली झाली. प्रथम संस्थापक अध्यक्ष कै.गोविदराव भगवान पेडणेकर यांनी चालू केलेली पतपेढी आजपर्यंत योग्य दिशेने काम करत आहे. आजपर्यंतच्या सर्व संचालकांनी पतपेढीची पत वाढविण्यासाठी प्रयत्न केले. तसेच काम आम्ही नविन संचालक मंडळ  करु असे आश्वासन चेअरमन बाबली वायंगणकर यांनी दिले.
You cannot copy content of this page