Headlines

देवसूतील कोसळलेल्या वीज खांबाची संजू परबांकडून पाहणी…

तातडीने दुरुस्तीचे काम पूर्ण करून वीजपुरवठा पूर्ववत करा: संजू परबांची अधिकाऱ्यांना सूचना..

⚡सावंतवाडी, ता.-: मुसळधार पावसामुळे सावंतवाडी तालुक्यातील देवसू येथे वीजेचा खांब कोसळल्याने गावातील वीजपुरवठा गेल्या चार दिवसांपासून खंडित झाला होता. या घटनेची माहिती मिळताच शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक संजू परब यांनी घटनास्थळी भेट देऊन कामाची पाहणी केली.

यावेळी त्यांनी संबंधित वीज विभागाच्या अधिकारी, लाईनमन व वायरमन यांना तातडीने दुरुस्तीचे काम पूर्ण करून गावातील वीजपुरवठा पूर्ववत करण्याच्या सूचना दिल्या. तसेच काम दर्जेदार व सुरक्षित पद्धतीने करण्यावर भर देण्याचेही त्यांनी सांगितले.
संजू परब यांनी गावात येऊन प्रत्यक्ष पाहणी करून प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले.

यावेळी संदीप सूर्यकांत सुकी, पंकज परब, प्रकाश सावंत, प्रथमेश सावंत, कृष्णा जाधव, उमेश सावंत, राजन जाधव, समीर शिंदे, ग्रामस्थ तसेच वीज विभागाचे लाईनमन व वायरमन उपस्थित होते.

You cannot copy content of this page