देवगड येथे २६ मे रोजी शासन आपल्या दारी व कृषी महोत्सवाचे आयोजन

⚡देवगड ता.२४-: मुख्यमंत्री शासकीय योजना नूतनीकरण अभियानांतर्गत ‘शासन आपल्या दारी ‘या कार्यक्रमाचे आयोजन महसूल विभाग तहसीलदार कार्यालय देवगड यांच्या वतीने शुक्रवार दि.२६ मे २०२३ रोजी स.१० ते सायंकाळी ५ या वेळेत सांस्कृतिक भवन जामसंडे या ठिकाणी करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाअंतर्गत आयोजित केलेल्या शिबिराचे उदघाटन आम.नितेश राणे यांच्या हस्ते उपविभागीय अधिकारी जगदीश कातकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.

सर्वसामान्य जनता व शेतकरी यांचे महसूल विभागाअंतर्गत क्षेत्रीय कार्यालयाशी संबंधित शासनाच्या विविध योजनेचा लाभ नागरिकांना व शेतमजुरांना देण्यासाठी तसेच विविध प्रकारचे दाखले,वाटप करणेसाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.तसेच याच दिवशी महाराष्ट्र शासन कृषी विभाग देवगड च्या वतीने कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती तालुका कृषी अधिकारी कैलास ढेपे यांनी दिली .या उदघाटन सोहळ्याचा तसेच शिबिराचा लाभ घ्यावा .असे आवाहन तहसीलदार स्वाती देसाई यांनी केले आहे.

You cannot copy content of this page