रुग्णवाहिका चालक दत्तात्रय मयेकर यांचा सत्कार

रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त करण्यात आला गौरव

मालवण (प्रतिनिधी)

जागतिक रस्ता सुरक्षा साप्ताहाअंतर्गत उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सिंधुदुर्ग व ब्रह्मकुमारी यांच्या वतीने विना अपघात सेवा देणाऱ्या १०८ व १०२ रुग्णवाहिकेच्या चालकांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये मालवण ग्रामीण रुग्णालयाचे १०८ रुग्णवाहिकेचे चालक दत्तात्रय हरिश्चंद्र मयेकर यांना विना अपघात व उत्तम सेवेबद्दल पदक आणि सन्मानपत्र देऊन आरटीओ पोलीस अधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

कणकवली जानवली येथे ब्रह्मकुमारी केंद्रात हा सन्मान सोहळा पार पडला. यामध्ये जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयाच्या रुग्णवाहिका चालकांना सन्मानित करण्यात आले. मालवण ग्रामीण रुग्णालयाच्या दत्तात्रय मयेकर यांच्यासमवेत रुग्णवाहिका चालक महेश वस्त यांनाही सन्मानित करण्यात आले. तर रुग्णवहीका चालक अवधूत परुळेकर हे सेवेवर कार्यरत असल्याने उपस्थित राहू शकले नाही. या कार्यक्रमास आरटीओ अधिकारी व ब्राह्मकुमारीच्या सेविका उपस्थित होत्या.

You cannot copy content of this page