Headlines

दोडामार्ग – गोवा सीमेवरील पेट्रोलपंप अज्ञात चोरट्यानी फोडला

१६ लाखांची रोकड केली लंपास , गोवा दोडामार्ग पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल दोडामार्ग ता.३० दोडामार्ग व गोवा राज्याच्या सीमेवरील भारत पेट्रोलियम कंपनीचा पेट्रोल पंप अज्ञात चोरट्यानी रविवारी फोडला . ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली.यावेळी चोरट्यानी १६ लाख रुपयांची रोकड लंपास केल्याची तक्रार पेट्रोलपंप मालकाने गोवा दोडामार्ग पोलीस दूरक्षेत्रात केली आहे.याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात…

Read More

गव्या रेड्याने दुचाकीला धडक दिल्याने डेगवे येथील दूध व्यवसायिक जखमी…

बांदा/प्रतिनिधीबांदा-दोडामार्ग रस्त्यावर पानवळ येथे गव्या रेड्याने रस्त्यावर येत दुचाकीला धडक दिल्याने डेगवे येथील दूध व्यावसायिक सागर स्वार हे जखमी झालेत. त्यांच्या दुचाकीवरील ४० लिटर दूध रस्त्यावर सांडल्याने त्यांचे नुकसान झाले. ही घटना आज सायंकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली. स्वार यांना बांद्याचे माजी सरपंच बाळा आकेरकर यांनी रुग्णालयात दाखल केले.

Read More

मनसेच्या माध्यमातून बैलवाडी ग्रामस्थांना मोफत पाणी पुरवठा

संतोष शिंगाडे, विमोल मयेकर यांनी भागविली ग्रामस्थांची तहान;नागरिकांनी केली होती मागणी देवगड देवगड जामसंडे शहरातील भीषण पाणीटंचाई लक्षात घेता प्रभाग क्रमांक १६ मधील बेलवाडी ग्रामस्थांनी मनसेचे माजी तालुका उपाध्यक्ष महेश नलावडे यांना पाणी पुरवठा करण्याची मागणी केली, दिनांक २७ मे २०२३ रोजी बेलवाडी ग्रामस्थांच्या मागणीनुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या म.न.चि.से.राज्य चिटणीस श्री संतोषजी शिंगाडे तसेच देवगड…

Read More

तुळस जैतिर उत्सवाची सांगता

कवळास पारंपारिक कार्यक्रमाने झाला समारोप ⚡वेंगुर्ला ता.२९-: वेंगुर्लातालुक्यातील तुळस गावात सुरु असलेल्या प्रसिद्धजैतिर उत्सवाची सांगता रविवारी कवळास या पारंपारिक कार्यक्रमाने झाली. उत्सव सांगतेला हजारो भाविकांनी उपस्थिती लावल्यामुळे मंदिर परिसर भाविकांनी फुलूनगेला होता.

Read More

पत्रकार निलेश मोरजकर यांना राष्ट्रीय पुरस्कार बहाल

महाराष्ट्र जर्नालिस्ट फाउंडेशनने केला सन्मान बांदा/प्रतिनिधीसाखळी-गोवा येथील रवींद्र भवनात महाराष्ट्र जर्नालिस्ट फाउंडेशनच्या वतीने आयोजित कार्यक्रमात येथील ‘सकाळ’चे बातमीदार निलेश मोरजकर यांना ‘द प्राईड ऑफ इंडिया: भास्कर अवॉर्ड या राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले.यावेळी व्यासपीठावर गोव्याचे ज्येष्ठ साहित्यिक तथा पद्मश्री विनायक खेडेकर, प्रमुख पाहुणे म्हणून माजी केंद्रीय कायदामंत्री अँड. रमाकांत खलप, फाउंडेशनचे अध्यक्ष राजीव लोहार, कामगार नेते…

Read More

जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांचे चिरेखाण संघटनेकडून स्वागत

⚡मालवण ता.२९-: सिंधुदुर्ग जिल्हा खनिकर्म अधिकारी अजित पाटील यांची नुकतीच कोल्हापुर येथे बदली होऊन त्यांच्या जागी नवीन जिल्हा खनिकर्म अधिकारी म्हणून वि. भु. सावे यांची नियुक्ती झाली आहे. शुक्रवारी ते ओरोस येथे जिल्हा खनिकर्म कार्यालयामध्ये हजर झाले. जिल्हा चिरेखाण संघटना अध्यक्ष संतोष गावडे, सहसचिव महादेव मालंडकर, बाबा कोकरे यांनी सावे यांची भेट घेऊन त्यांचे स्वागत…

Read More

सध्याच्या काळाची गती पकडणाऱ्या साहित्याची निर्मिती आवश्यक – प्रा. प्रवीण बांदेकर

⚡मालवण ता.२९-: विविध सामाजिक माध्यमांद्वारे आज लोकांचे मनोरंजन होत आहे. अशा स्थितीत आजच्या सोशल माध्यमांना ओलांडून जाणारे व सध्याच्या काळाची गती पकडणाऱ्या साहित्याची निर्मिती साहित्यिकांकडून होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक प्रा. प्रवीण बांदेकर यांनी येथे केले. महाराष्ट्र विद्रोही सांस्कृतिक चळवळीतर्फे आयोजित विद्रोही चिंतन शिबिराचे उद्घाटन मालवण येथील बॅ. नाथ पै सेवांगण येथे झाले….

Read More

नगर वाचन मंदिरतर्फे जिल्हास्तरीय खुली शिवकथा स्पर्धा

⚡मालवण ता.२९-: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पुर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने नगर वाचन मंदिर, मालवण तर्फे ‘जिल्हास्तरीय खुली शिवकथा स्पर्धा’ मंगळवार दि. ६ जून रोजी दुपारी ३.३० वाजता ग्रंथालयाच्या सभागृहामध्ये आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत वयवर्षे १५ व त्यावरील स्पर्धकांना सहभाग मिळेल. ही स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावरील प्रसंगावर आधारित असून…

Read More

सेवानिवृत्त शिक्षकांचे जिल्हा परिषदेसमोर पंचनाद आंदोलन

सिंधुदुर्गनगरी ता २९जिल्हा परिषद अधिकाऱ्यांच्या चुकीच्या कार्यपद्धतीमुळे जिल्ह्यातील सेवानिवृत्त शिक्षकांना गेले ११ महिने आर्थिक लाभाची प्रतीक्षा करावी लागत आहे. जिल्हा परिषद प्रशासन जाणीवपूर्वक सेवानिवृत्त शिक्षकांना लाभ देण्यास विलंब करीत आहे. या कार्यपद्धतीचा निषेध करण्यासाठी जिल्ह्यातील सेवानिवृत्त शिक्षकानी आज जिल्हा परिषदेसमोर “पंचनाद” निषेध आंदोलन केले. घंटानाद, थाळीनाद, टाळनाद, डबानाद, व ढोलनाद करत प्रशासनाचे लक्ष वेधले. मुख्य…

Read More

‘मागेल त्याला हळद रोपे’ असा उपक्रम सुरु करा…

मंत्री रविद्र चव्हाण; हळद लागवड बैठकीत आवाहन ⚡सिंधुदुर्गनगरी ता.२९-: हळदीचे लागवड क्षेत्र जिल्ह्यात वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना हळदीची रोपे, कंद हे योग्य भावात मिळायला हवीत. त्यासाठी लोकसहभागातून बियाण्यांची बँक बनवा, असे निर्देश पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी कृषी विभागाला दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात हळद लागवड नियोजन बैठक आज घेण्यात आली. बैठकीला आमदार नितेश राणे, जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी…

Read More
You cannot copy content of this page