⚡मालवण ता.२९-: सिंधुदुर्ग जिल्हा खनिकर्म अधिकारी अजित पाटील यांची नुकतीच कोल्हापुर येथे बदली होऊन त्यांच्या जागी नवीन जिल्हा खनिकर्म अधिकारी म्हणून वि. भु. सावे यांची नियुक्ती झाली आहे. शुक्रवारी ते ओरोस येथे जिल्हा खनिकर्म कार्यालयामध्ये हजर झाले. जिल्हा चिरेखाण संघटना अध्यक्ष संतोष गावडे, सहसचिव महादेव मालंडकर, बाबा कोकरे यांनी सावे यांची भेट घेऊन त्यांचे स्वागत केले.
यावेळी चिरेखाण संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सावे यांच्याशी चिरेखाण व्यावसायिकांच्या समस्यांबाबत चर्चा करून सहकार्य करण्याचे आवाहन केले. व्यवसायिकांना सहकार्य केले जाईल, असे यावेळी सावे यांनी सांगितले.
