संतोष शिंगाडे, विमोल मयेकर यांनी भागविली ग्रामस्थांची तहान;नागरिकांनी केली होती मागणी
देवगड देवगड जामसंडे शहरातील भीषण पाणीटंचाई लक्षात घेता प्रभाग क्रमांक १६ मधील बेलवाडी ग्रामस्थांनी मनसेचे माजी तालुका उपाध्यक्ष महेश नलावडे यांना पाणी पुरवठा करण्याची मागणी केली, दिनांक २७ मे २०२३ रोजी बेलवाडी ग्रामस्थांच्या मागणीनुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या म.न.चि.से.राज्य चिटणीस श्री संतोषजी शिंगाडे तसेच देवगड संपर्क अध्यक्ष विमोल मयेकर यांच्या माध्यमातून मोफत पाणी वाटप करण्यात आले यावेळी मा.सहसंपर्क अध्यक्ष संतोष मयेकर,मा. तालुकाध्यक्ष चंदन मेस्त्री, उप तालुकाध्यक्ष महेश नलावडे महाराष्ट्र सैनिक बबलू परब तसेच स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते. सदर प्रसंगी बेलवाडी ग्रामस्थांनी देवगड शहरातील पाणी टंचाईवर तीव्र नाराजी व्यक्त केली तसेच मनसे अध्यक्ष. राज ठाकरेंच्या पाणीदुत महाराष्ट्र सैनिकांचे आभार मानले तसेच..यापुढेही सहकार्य व्हावं अशी अपेक्षा व्यक्त केली
