बांदा/प्रतिनिधी
बांदा-दोडामार्ग रस्त्यावर पानवळ येथे गव्या रेड्याने रस्त्यावर येत दुचाकीला धडक दिल्याने डेगवे येथील दूध व्यावसायिक सागर स्वार हे जखमी झालेत. त्यांच्या दुचाकीवरील ४० लिटर दूध रस्त्यावर सांडल्याने त्यांचे नुकसान झाले. ही घटना आज सायंकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली. स्वार यांना बांद्याचे माजी सरपंच बाळा आकेरकर यांनी रुग्णालयात दाखल केले.
गव्या रेड्याने दुचाकीला धडक दिल्याने डेगवे येथील दूध व्यवसायिक जखमी…
