१६ लाखांची रोकड केली लंपास , गोवा दोडामार्ग पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल
दोडामार्ग ता.३० दोडामार्ग व गोवा राज्याच्या सीमेवरील भारत पेट्रोलियम कंपनीचा पेट्रोल पंप अज्ञात चोरट्यानी रविवारी फोडला . ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली.यावेळी चोरट्यानी १६ लाख रुपयांची रोकड लंपास केल्याची तक्रार पेट्रोलपंप मालकाने गोवा दोडामार्ग पोलीस दूरक्षेत्रात केली आहे.याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
