पालकमंत्री चव्हाण यांचे उपसरपंच अमित परब यांना आश्वासन
⚡सावंतवाडी ता.३०-: चराठा गावातील गावठण येथील घाणवड वाडीतील बंधाऱ्याच्या दुरावस्थे बाबत चराठा उपसरपंच अमित परब यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे लक्ष वेधले असून हा बंधारा गेली कित्येक वर्ष नादुरूस्त अवस्थेत होता. याची डागडुजी करण्यात न आल्याने तेथील शेतकरीवर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
या बंधाऱ्याच्या आधारावर शेतकरी उन्हाळी पीक घेत असत. पण बंधाऱ्याची दुरावस्था झाल्यामूळे पाणी साठवण होत नसल्याने शेतकऱ्यांना शेती करणे अवघड झाले आहे. ही माहीती ग्रामपंचायत सदस्य अमर चराठकर यानी उपसरपंच अमित परब याच्या लक्षात आणून दिल्याने त्यांनी लगेेचच दौऱ्यावर आलेले पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची भेट घेऊन ही गोष्ट लक्षात आणून दिली. येणाऱ्या काळात या बंधाऱ्याला निधी उपलब्ध करून देण्यात येईल असे आश्वासन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी चराठा उपसरपंच अमित परब यांना यावेळी दिले.
