⚡मालवण ता.२९-: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पुर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने नगर वाचन मंदिर, मालवण तर्फे ‘जिल्हास्तरीय खुली शिवकथा स्पर्धा’ मंगळवार दि. ६ जून रोजी दुपारी ३.३० वाजता ग्रंथालयाच्या सभागृहामध्ये आयोजित करण्यात आली आहे.
या स्पर्धेत वयवर्षे १५ व त्यावरील स्पर्धकांना सहभाग मिळेल. ही स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावरील प्रसंगावर आधारित असून स्पर्धेसाठी वेळ मर्यादा ७ ते १० मिनिटे राहिल. स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे रोख रू. ११११/-, रू. ७७७/-, रू. ५५५/- तसेच प्रत्येक सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येतील. अधिक माहिती व नावनोंदणीसाठी श्रेया चव्हाण ८३९०६९४३३१ या नंबरवर दि. ४ जून पर्यंत संपर्क साधावा. या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन उदयराव मोरे यांनी केले आहे.
