Headlines

२८२ पदांची जाहिरात, प्रत्यक्षात १६९ जण हजर

ओरोस, ता. ७ :जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांतील शिक्षकांची कमतरता दूर करण्याच्या दृष्टीने सुरू असलेल्या भरती प्रक्रियेत पवित्र पोर्टलद्वारे पात्र ठरलेल्या १८८ उमेदवारांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याला पसंती दिली आहे. यापैकी कागदपत्र पडताळणीसाठी बोलावलेल्या उमेदवारांपैकी १६९ जण उपस्थित राहिले. तर १९ जण अनुपस्थित राहिले. उपस्थित राहिलेल्या उमेदवारांच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे, अशी माहिती जिल्हा परिषद शिक्षण सभापती…

Read Full News

‘विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग 2027’चा शुभारंभ

युवकांनी ‘विकसित भारत क्विझ’मध्ये सहभागी व्हावे VBYLD 2027 चे विविध टप्पेटप्पा 1 – विकसित भारत क्विझ :MY Bharat पोर्टलवर डिजिटल/ऑनलाईन क्विझ.कालावधी : 17 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर 2026टप्पा 2 – विकसित भारत निबंध स्पर्धा :क्विझमधून निवड झालेल्या सहभागी युवकांनी निश्चित केलेल्या ‘विकसित भारत’ विषयावर 500 शब्दांचा निबंध सादर करावयाचा आहे.कालावधी : 5 ते 19 ऑक्टोबर…

Read Full News

स्वच्छता कर्मचाऱ्यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी : संतोष लुडबे…

⚡मालवण,ता.०७-:स्वच्छता कर्मचारी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता शहराची स्वच्छता राखत नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत असतात. त्यांच्या या महत्त्वपूर्ण योगदानाची समाजाने सदैव जाणीव ठेवली पाहिजे. स्वच्छता कर्मचाऱ्यांप्रती असलेले प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे असे प्रतिपादन मातृत्व आधार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संतोष लुडबे यांनी येथे बोलताना केले. मालवण वायरी येथे मातृत्व आधार फाउंडेशनच्या…

Read Full News

मंत्री नितेश राणे यांनी घेतली जेष्ठ नेते शरद पवारांची ‘सिल्वर ओक’वर भेट…

*ससून डॉकच्या आधुनिकीकरणासह मच्छीमारांच्या हिताच्या विविध विषयांवर चर्चा:मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजनेची दिली माहिती.. ⚡मुंबई दि.०७-: मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार यांची आज ‘सिल्वर ओक’ निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. या भेटीत राज्यातील मत्स्य व्यवसाय, मच्छीमार बांधवांचे हित आणि बंदरांच्या विकासासंदर्भात विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली. ससून डॉकच्या आधुनिकीकरणासाठी मत्स्य…

Read Full News

“सिंधुदुर्गातले पैसे…..सिंधुर्गातच रवाक व्हये”….

सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष श्री. मनीष दळवी यांचा प्रेरणादायी व्हिडीओ वेंगुर्लासिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष म्हणून प्रभावी कामगिरी बजावलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष व वेंगुर्ला तालुक्याचे सुपुत्र मनीष प्रकाश दळवी यांनी श्री गणेश चतुर्थी सणाच्या अनुषंगाने व्हिडिओच्या माध्यमातून केलेले आवाहन निश्चितच बोध घेण्यास लावणारे आहे.सिंधुदुर्गातले पैसे.. सिंधुर्गातच रवाक व्हये…. या त्यांच्या मालवणी भाषेतील व्हिडिओद्वारे जनमानसात एकच…

Read Full News

शेतकऱ्यांना काजू कारखान्यात ५० टक्के भागीदारी देणार…

अतुल रावराणे:करुळ येथील काजू प्रकल्पात प्रक्रिया उद्योग ; काजू शेतक-यांनी भागधारक होण्यासाठी अर्ज भरावेत.. ⚡कणकवली ता.०७-: राजकारणात शब्द देणे सोपे असते. मात्र, दिलेला शब्द पूर्ण करण्याची ताकद आणि प्रामाणिकपणा माझ्यात आहे. कोविड काळात सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांसाठी काजू प्रकल्प उभारण्याचा शब्द दिला होता. आता काजू प्रक्रिया कारखाना करुळ येथील खरेदी केला आहे. चार वर्षे काजू कलमे वाटप…

Read Full News

मालवण तालुकास्तरीय शासकीय क्रीडा स्पर्धांचा थाटात शुभारंभ…

मालवण दि (प्रतिनिधी) तालुका क्रीडा स्पर्धा म्हणजे केवळ विविध खेळांच्या स्पर्धा नव्हेत, तर विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कौशल्याला, जिद्दीला, आत्मविश्वासाला आणि खिलाडूवृत्तीला व्यासपीठ मिळवून देणारा एक उत्सव आहे. या उत्सवात सहभागी होणाऱ्या सर्वांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे, खेळाडूंनी नियमांचे पालन करतानाच खिलाडूवृत्ती जोपासत यश संपादन करताना आपल्या बरोबरच आपल्या शाळेचे आणि गावाचे नाव उज्वल करावे,…

Read Full News

जलस्रोत बाधित करणाऱ्या चिरेखाणी विरोधात कुडोपी ग्रामस्थांचे आंदोलन

मालवण (प्रतिनिधी) कुडोपी गाव व परिसरात सुरू असलेल्या लाल दगडाच्या उत्खननामुळे नैसर्गिक झरे, विहिरी तसेच अन्य जलस्रोत बाधित होऊन पाणी दूषित होत असल्याने सदर चिरे खाण बंद करावी या मागणीसाठी आज कुडोपी ग्रामस्थांनी मालवण तहसील कार्यालयासमोर आंदोलन छेडले. यावेळी ग्रामस्थांनी आपल्या मागण्या तहसीलदार गणेश लव्हे यांच्याकडे मांडल्यानंतर तहसीलदार श्री. लव्हे यांनी सदर खाणी बाबत महाराष्ट्र…

Read Full News

रोझरी मच्छिमार सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी रुजारिओ पिंटो यांची तिसऱ्यांदा फेरनिवड

मालवण (प्रतिनिधी) रोझरी मच्छिमार सहकारी संस्था मर्यादित मालवण या संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत संस्थेच्या अध्यक्षपदी रुजारिओ पिंटो यांची तिसऱ्यांदा बिनविरोध फेरनिवड करण्यात आली. तर उपाध्यक्ष पदी पास्कॉल पिंटो यांची निवड करण्यात आली. या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अजय हिर्लेकर यांनी काम पाहिले. संस्थेच्या संचालक मंडळामध्ये सदस्य म्हणून रेजिनॉल्ड रॉड्रिक्स, रॉर्बट फर्नांडीस, सौ. बॅनी फर्नांडीस. सौ….

Read Full News

साहित्यिकांच्या कृतीतून शैक्षणिक व सामाजिक क्रांती घडते : अजयराज वराडकर…

⚡मालवण ता.०७-:साहित्य हा समाजाचा आरसा असतो आणि साहित्यिक त्याद्वारे समाजाचे प्रतिबिंब दाखवत असतो. अशाच साहित्यिकाच्या प्रत्यक्ष कृतीतून शैक्षणिक क्रांती विद्यालयाच्या रूपाने अजरामर होत असते. या विद्यालयाच्या माध्यमातून सामाजिक क्रांती घडत असून, येथून शिक्षण घेऊन विद्यार्थ्यांनी घडवलेले उज्ज्वल भविष्य हीच या कार्याची खरी पोचपावती आहे, असे प्रतिपादन कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अजयराज वराडकर यांनी…

Read Full News

You cannot copy content of this page