Headlines

रोझरी मच्छिमार सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी रुजारिओ पिंटो यांची तिसऱ्यांदा फेरनिवड

मालवण (प्रतिनिधी)

रोझरी मच्छिमार सहकारी संस्था मर्यादित मालवण या संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत संस्थेच्या अध्यक्षपदी रुजारिओ पिंटो यांची तिसऱ्यांदा बिनविरोध फेरनिवड करण्यात आली. तर उपाध्यक्ष पदी पास्कॉल पिंटो यांची निवड करण्यात आली.

या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अजय हिर्लेकर यांनी काम पाहिले. संस्थेच्या संचालक मंडळामध्ये सदस्य म्हणून रेजिनॉल्ड रॉड्रिक्स, रॉर्बट फर्नांडीस, सौ. बॅनी फर्नांडीस. सौ. ग्रासीन ऑगस्तीन डिसोजा, सौ. फिलोमिना पिंटो, ऑल्विना फ्रान्सिस मेंडोसा, सौ. डेन्सी डेनीस नरोन्हा, सौ. गायत्री गणपत मिठबावकर, गणपत मिठबावकर, सात्वादर मिरांडा यांची निवड करण्यात आली. निवडीनंतर अध्यक्ष रुजारिओ पिंटो व उपाध्यक्ष पास्कॉल पिंटो यांचे संचालक मंडळ व सदस्यांकडून अभिनंदन करण्यात आले.

You cannot copy content of this page