Headlines

साहित्यिकांच्या कृतीतून शैक्षणिक व सामाजिक क्रांती घडते : अजयराज वराडकर…

⚡मालवण ता.०७-:
साहित्य हा समाजाचा आरसा असतो आणि साहित्यिक त्याद्वारे समाजाचे प्रतिबिंब दाखवत असतो. अशाच साहित्यिकाच्या प्रत्यक्ष कृतीतून शैक्षणिक क्रांती विद्यालयाच्या रूपाने अजरामर होत असते. या विद्यालयाच्या माध्यमातून सामाजिक क्रांती घडत असून, येथून शिक्षण घेऊन विद्यार्थ्यांनी घडवलेले उज्ज्वल भविष्य हीच या कार्याची खरी पोचपावती आहे, असे प्रतिपादन कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अजयराज वराडकर यांनी कट्टा ता. मालवण येथे बोलताना केले.

कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या विद्यालयात स्वर्गीय प्रा. शरद वराडकर यांच्या जयंतीनिमित्त इंग्रजी विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या काव्य गायन स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ तसेच प्रा शरद
वराडकर यांच्या पुस्तकांचे प्रदर्शन पार पडले त्यावेळी ते बोलत होते
यावेळी स्कूल कमिटी चेअरमन सुधीर वराडकर, प्रशालेचे पर्यवेक्षक महेश विठ्ठल भाट, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आदी व इतर उपस्थित होते

प्रारंभी स्व. शरद वराडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. तर मुख्याध्यापिका देवयानी गावडे यांनी प्रास्ताविक केले.

यावेळी अध्यक्ष अजयराज वराडकर यांनी योगात्मा डॉ. काकासाहेब वराडकर यांनी लावलेल्या या शैक्षणिक रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर करणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले.

कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे सचिव सुनील नाईक यांनी स्व. प्रा. शरद वराडकर यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्यातील आठवणींना उजाळा दिला.

काव्यगायन स्पर्धा व उपक्रम
कार्यक्रमाची सुरुवात सुमधुर संगीतमय प्रार्थनेने झाली. स्व. शरद वराडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी इंग्रजी विभागाच्या वतीने काव्यगायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणांतून स्व. शरद वराडकर यांचा जीवनपट उलगडला.
काव्यगायन स्पर्धेतील विजेते असे प्रथम – मिथिल विजय गुराम, द्वितीय – उत्कर्ष वितेंद्र बोडये, तृतीय – आदर्श विलास इंदप व विभा दर्पण मेस्त्री, उत्तेजनार्थ – ग्रीष्मा संदीप गोळवणकर, गौरांगी धनंजय वायंगणकर व खुशी गणेश वाईरकर
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंग्रजीतून करण्यात आले. तसेच स्वर्गीय प्रा. शरद वराडकर यांच्या पुस्तकांचे प्रदर्शन हे या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले.
यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमासाठी इंग्रजी विभाग प्रमुख किसन हडलगेकर आणि विषय शिक्षक एकनाथ राऊळ यांचे मार्गदर्शन लाभले. सूत्रसंचालन विद्यार्थिनी यामिनी म्हाडगुत हिने केले, तर ईशा ताम्हणकर हिने आभार मानले

You cannot copy content of this page