Headlines

मालवण मच्छिमार सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी विकी चोपडेकर यांची तिसऱ्यांदा फेरनिवड

उपाध्यक्षपदी बाळू तारी यांची फेरनिवड

मालवण (प्रतिनिधी)

मालवण मच्छिमार सहकारी संस्था मर्यादित, मालवण या संस्थेच्या २०२६ – २७ ते २०३० – ३१ या कालावधीसाठी संचालक मंडळाची निवडणूक नुकतीच पार पडली. यामध्ये संस्थेच्या अध्यक्षपदी कांचन उर्फ विकी अरुण चोपडेकर यांची तिसऱ्यांदा फेरनिवड करण्यात आली. तर उपाध्यक्ष पदी श्रीकृष्ण उर्फ बाळू भगवान तारी यांचीही फेरनिवड करण्यात आली. या दोन्ही निवडी बिनविरोध झाल्या.

या निवडीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक अजय हिर्लेकर यांनी काम पाहिले. या संस्थेच्या संचालक मंडळामध्ये सदस्य म्हणून तुळशीदास लाडोबा तोडणकर, लक्ष्मण मुरलीधर भगत, कमलाकांत शशिकांत कोचरेकर, स्वप्निल भास्कर आचरेकर, जेम्स रेमेत ब्रिटो, विल्सन एलविन डिसोझा, निलेश बाळकृष्ण कांदळगांवकर, विद्या विनायक मोरजकर, सविता संतोष तांडेल यांची निवड करण्यात आली. या संस्थेच्या सचिव म्हणून सौ. ऋतुजा रघुनाथ मोंडकर या काम पाहतात.

अध्यक्षपदी व उपाध्यक्ष पदी फेरनिवड झाल्याबद्दल विकी चोपडेकर व बाळू तारी यांचे संचालक मंडळ व सदस्यांकडून अभिनंदन करण्यात आले. निवडीनंतर बोलताना अध्यक्ष विकी चोपडेकर म्हणाले, या संस्थेचे अध्यक्ष पद यापूर्वी श्रीकृष्ण ताम्हणकर, नारायण कवटकर, तुळशीदास तोडणकर यांच्यासारख्या जाणकार व्यक्तींनी भूषविले आहे. अध्यक्ष म्हणून माझ्यावर सलग तिसऱ्यांदा विश्वास दाखवल्याबद्दल मी सहकाऱ्यांचा आभारी असून हा विश्वास सार्थ ठरविण्याचा प्रयत्न करेन. संस्थेच्या माध्यमातून मच्छिमार सदस्यांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्याचा व मच्छिमारांचे कल्याण साधण्यासाठी आपण कार्यरत राहू, असेही श्री. चोपडेकर म्हणाले.

You cannot copy content of this page