Headlines

“सिंधुदुर्गातले पैसे…..सिंधुर्गातच रवाक व्हये”….

सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष श्री. मनीष दळवी यांचा प्रेरणादायी व्हिडीओ

वेंगुर्ला
सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष म्हणून प्रभावी कामगिरी बजावलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष व वेंगुर्ला तालुक्याचे सुपुत्र मनीष प्रकाश दळवी यांनी श्री गणेश चतुर्थी सणाच्या अनुषंगाने व्हिडिओच्या माध्यमातून केलेले आवाहन निश्चितच बोध घेण्यास लावणारे आहे.
सिंधुदुर्गातले पैसे.. सिंधुर्गातच रवाक व्हये…. या त्यांच्या मालवणी भाषेतील व्हिडिओद्वारे जनमानसात एकच सकारात्मक संदेश गेला आहे.
माजी मुख्यमंत्री खा. नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करून पर्यटन विकासाची मुहूर्तमेढ रोवली आहे. त्यामुळे आज आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पर्यटन विकास भरीव गतीने होत आहे, हे नाकारून चालणार नाही. आज श्री गणेश चतुर्थी सण तोंडावर आला असून शहरासह ग्रामीण भागात खरेदीसाठी लगबग सुरू झाली आहे. याबाबतीत सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी मालवणी भाषेतून व्हिडिओद्वारे दिलेल्या संदेश निश्चितच प्रेरणादायी म्हणावा लागेल. आज युवा – युवती वर्ग अधिकाधिक डिजिटल प्लॅटफॉर्म द्वारे खरेदी करतो आहे. त्यामुळे याबाबतीत त्यांनी, करण्यात येणारी खरेदी ही स्थानिक बाजारपेठेत करण्यात यावी, जेणेकरून येथील व्यापाऱ्यांना हातभार लागेल. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुसंख्य
बचतगट आज प्रभावी कामगिरी करत आहेत. विविध प्रकारची उत्पादने घेऊन चांगले काम करीत आहेत. त्यामुळे त्यांची ही उत्पादने स्थानिक स्तरावर खरेदी केल्यास निश्चितच स्थानिकांना व महिलांनाही त्याचा फायदा होईल. याबाबतीत त्यांनी प्रबोधनात्मक व्हिडिओ सादर केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून सिंधुदुर्ग जिल्ह्यासह ग्रामीण भागात यास उत्स्फूर्त पाठिंबा मिळत असून याबाबत त्यांचे आबालवृद्धातून विशेष कौतुक करण्यात येत आहे. विशेषतः त्यांनी जिल्हा बँकेद्वारे कृषी क्षेत्रात केलेली घोडदौड निश्चितच वाखाणण्याजोगी असून सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या विकासाचा आलेख उंचावला असून यामुळे सिंधुदुर्गच्या विकासाच्या जडणघडणीस निश्चितच मोलाचा हातभार लागला आहे. त्यामुळे त्यांनी पालकमंत्री ना.नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यात विकासासाठी दिलेले योगदान व जिल्हा बँकेसाठी तळमळीने, प्रामाणिकपणे, नम्रपणे व शेतकऱ्यांच्या हितासाठी केलेले कार्य प्रेरणादायी मानले जात असून युवा वर्गातून, सर्वसामान्य जनतेतून याबद्दल कौतुक होत आहे. सिंधुदुर्गातले पैसे.. सिंधुर्गातच रवाक व्हये…. या त्यांच्या मालवणी व्हिडिओद्वारे जनमानसात एकच सकारात्मक संदेश गेला असून त्यांच्या समाजाप्रती असलेल्या कर्तव्याचे यातून दर्शन होत आहे. युवा तालुका पदाधिकारी म्हणून कार्य सुरू केलेल्या श्री. मनीष दळवी यांनी सर्वसामान्य जनतेशी आपलि नाळ तुटू न देता गेल्या वीस ते पंचवीस वर्षात आपल्या प्रामाणिक व नम्र वागणुकीने समाजात एक आदर्श स्थान प्रस्थापित केले आहे. आज त्यांनी जिल्हा बँकेची धुरा सांभाळताना केलेले कार्य राज्यस्तरापर्यंत दखलपात्र ठरले शेतकऱ्यांच्या गोरगरीब जनतेच्या हितासाठी झटणारा नेता अशी त्यांची क्रेझ निर्माण झाली आहे. आज युवा वर्ग डिजिटल, सोशल मीडिया च्या माध्यमातून जो ऑनलाईन खरेदीचा आटापिटा लावत आहे, त्यास बगल देऊन त्यांनी स्थानिक स्तरावर युवकांनी, नागरिकांनी खरेदी करून येथील पैसा येथेच राहून आपल्या तालुक्याचा, सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास व्हावा, ही व्यक्त केलेली भावना निश्चितच प्रेरणादायी मानली जात आहे. त्यांनी वेंगुर्ला तालुक्यातील होडावडा गावातून ग्रामीण स्तरावर, त्यानंतर वेंगुर्ला तालुक्यात युवा वर्गासाठी, तसेच राजकीय पातळीवर, सामाजिक पातळीवर कार्यरत राहून समाजासाठी आदर्श असे कार्य केले आहे. त्यांना सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष पदाची मिळालेली संधी त्यांनी जनतेच्या हितासाठीच खर्ची घातली आहे. त्यामुळे त्यांनी मालवणी भाषेतून व्हिडिओतुन केलेला आवाहन मालवणी माणसाक निश्चितच आदराचा व प्रेरणादायी असाच वाटता हा! स्थानिक बाजारपेठेत खरेदी करण्याकडे लोकांनी अधिक महत्त्व दिला तर निश्चितच हयल्या भागाचो अधिकचो विकास होवक वेळ लागाचो नाय.. ह्या यातून स्पष्ट होताहा!

You cannot copy content of this page