डेरवण येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड

मालवण दि प्रतिनिधी
क्रीडा व युवा संचानालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत ,जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदूर्ग व जिल्हा क्रीडा परिषद सिंधुदूर्ग, आयोजित ओरोस येथे झालेल्या जिल्हास्तरीय शालेय खो खो स्पर्धेत श्री रेकोबा हायस्कूल वायरी मालवणच्या १४ वर्षाखालील मुलांच्या संघाने विजेतेपद मिळवून चिपळूण ( डेरवण ) येथे होणाऱ्या विभागस्तरीय स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली आहे.
या स्पर्धेत जीत लुडबे , केदार मसुरकर , चैतन्य आळवे सोहम वरक यांनी चमकदार कामगिरी करून विजेतेपद पटकावून दिले. या संघात सहभागी खेळाडू देवेन चव्हाण ,मृणाल चव्हाण , तन्मय मालंडकर, पारस मालंडकर, गौरांग सावंत ,बापू झोरे,कौस्तुभ नाईक ,विनायक वरक ,हार्दिक परुळेकर, राजेश मालवणकर ,कार्तिक गोसावी यांनी सामन्यात मोलाची कामगिरी बजावली
या स्पर्धेसाठी त्यांना प्रशालेचे क्रीडा शिक्षक श्रीनाथ फणसेकर यांचे मार्गदर्शन लाभले. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था पदाधिकारी, शालेय समिती पदाधिकारी तसेच मुख्याध्यापक श्री संजय खोचरे , पालक शिक्षक संघ पदाधिकारी, शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी, माजी विद्यार्थी वर्ग, पालक वर्ग यांनी अभिनंदन केले आहे
