Headlines

Global Maharashtra Breaking News

तावडेंच्या पाठपुराव्याला यश; ओरोस महामार्गावर सुरक्षा उपाय सुरू…

धोकादायक ठिकाणी कामाला सुरुवात; कायमस्वरूपी उपाययोजनांची मागणी.. ⚡ओरोस, ता. २५-: सिंधुदुर्गनगरी मधील ओरोस येथील मुंबई-गोवा महामार्गावरील धोकादायक वळणे, अपुरी सुरक्षा व्यवस्था आणि सर्व्हिस रोडवरील अपघातांचा प्रश्न ग्रामपंचायत सदस्य योगेश तावडे यांनी सातत्याने लावून धरल्यानंतर अखेर प्रशासनाने त्याची दखल घेतली आहे. संबंधित धोकादायक ठिकाणी सुरक्षा उपाययोजनांची कामे सुरू करण्यात आली असून तावडे यांच्या पाठपुराव्याला यश आले…

Read Full News

अंकुर निवारा केंद्रातील महिलांना व्यावसायिक प्रशिक्षण…

सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचा पुढाकार; प्रशिक्षणातून रोजगार निर्मितीचा संकल्प.. सावंतवाडी : समाजसेवा आणि आरोग्यसेवेच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानने आता निराधार व हतबल महिलांना स्वावलंबी करण्यासाठी ‘व्यावसायिकदृष्ट्या सक्षम महिला’ हा उपक्रम हाती घेतला आहे. संस्थेचे अध्यक्ष प्रा. सतीश बागवे यांच्या मार्गदर्शनाखाली सावंतवाडी येथील अंकुर निवारा केंद्रात या उपक्रमांतर्गत विविध व्यावसायिक प्रशिक्षणांना सुरुवात झाली आहे….

Read Full News

सिंधुदुर्ग जिल्हा वकील संघटनेतर्फे अॅड. विवेक गोखले यांना श्रद्धांजली…

⚡वैभववाडी ता.२५-: सिंधुदुर्ग जिल्हा वकील संघटनेच्या वतीने वैभववाडी येथील युवा वकील अॅड. विवेक गोखले यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. अॅड. गोखले यांचे वयाच्या अवघ्या ३४व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आकस्मिक निधन झाले. त्यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा न्यायालयात रेफरन्स कार्यक्रम आयोजित करण्यात आला.या वेळी प्रधान जिल्हा न्यायाधीश डॉ. देशपांडे, जिल्हा न्यायालयातील सर्व न्यायाधीश, सिंधुदुर्ग जिल्हा वकील…

Read Full News

नगरसेविका नीना मुंबरकर व नागरिकांच्या पुढाकारातून आडारी मार्गावरील झाडी हटविली

मालवण दि प्रतिनिधीमालवण शहरातील देऊळवाडा– आडारी मार्गालगत वाढलेल्या दाट झाडीमुळे वाहतुकीस होत असलेला अडथळा लक्षात मालवणच्या नगरसेविका नीना मुंबरकर यांनी पुढाकार घेत सोमवारी सकाळी नगरपरिषदेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांसह जेसीबीच्या सहाय्याने आणि स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने ही झाडी हटविण्यात आली देऊळवाडा– आडारी मार्गालगत वाढलेल्या दाट झाडीमुळे वाहतुकीस होत असलेला अडथळा होत होता तर झाडांच्या फांद्या व वेली वीज…

Read Full News

राकेश परब यांचे कर्तृत्व प्रेरणादायी व अभिमानास्पद…

जिल्हाप्रमुख दत्ता सामंत:विविध सामाजिक उपक्रमांनी राकेश परब यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न.. ⚡सिंधुदुर्ग दि.२४-: मालवण तालुक्यातील चुनवरे गावचे सुपुत्र आणि राज्याचे मत्स्य आणि बंदरे विकासमंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांचे स्विय सहाय्यक राकेश परब यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. वाढदिवसाच्या शुभेच्छांचा मुख्य कार्यक्रम पोईप हायस्कुल सभागृहात आयोजित करण्यात आला…

Read Full News

वेंगुर्ला एस. टी. आगारात प्रवाशांसाठी “मोफत वाचनालय” सुविधा…

श्री. प्रसन्ना देसाई:नवनवीन पुस्तके- वर्तमानपत्रे उपलब्धतेचे नवे दालन.. ⚡वेंगुर्ला ता.२४-:वेंगुर्ला एस. टी. आगारात प्रवाशांसाठी मोफत वाचनालय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी विविध संकल्पन्नाद्वारे देशाला प्रगतीपथावर नेत आहेत. त्याचाच भाग म्हणून जिल्ह्यासह वेंगुर्ला तालुक्यातही नवीन दालने उपलब्ध करण्याचा प्रयत्न आहे.लवकरच प्रवाशांसाठी नवनवीन पुस्तकांचा तसेच वर्तमानपत्र उपलब्ध करुन देण्याचे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तथा सेवा…

Read Full News

संरक्षण मंत्री यांच्या गोवा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पत्रादेवी येथे अवजड वाहनांना तात्पुरती प्रवेशबंदी

सिंधुदुर्गनगरी, दि. २४ : देशाचे संरक्षण मंत्री यांच्या गोवा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर गोवा प्रशासनाच्या विनंतीवरून दि. २६ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इन्सुली चेक पोस्टवरून पत्रादेवी येथे गोवा राज्यात प्रवेश करणाऱ्या अवजड वाहनांना तात्पुरती प्रवेशबंदी करण्यात आली आहे. दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर वाहतूक व्यवस्था सुरळीत व सुरक्षित ठेवण्यासाठी ही खबरदारीची उपाययोजना करण्यात…

Read Full News

ईद-ए-मिलाद, नारळी पौर्णिमा, दहीहंडी व गणेशोत्सव शांततेत साजरे करा..

जिल्हा शांतता समितीच्या बैठकीत पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांचे आवाहन सिंधुदुर्गनगरी, दि. २४ : ईद-ए-मिलाद, नारळी पौर्णिमा, दहीहंडी आणि गणेशोत्सव हे विविध धर्मीयांच्या श्रद्धेशी निगडित महत्त्वाचे सण एकाच कालावधीत येत आहेत. या पार्श्वभूमीवर सर्व समाजघटकांनी परस्परांच्या श्रद्धा व भावनांचा आदर राखत सण-उत्सव शांततेत आणि सलोख्याच्या वातावरणात साजरे करावेत, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ….

Read Full News

वैभववाडीतील युवा वकील ॲड. विवेक गोखले यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन…

वैभववाडी प्रतिनिधीमहाराष्ट्र ब्राह्मण मंडळ सिंधुदुर्गचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य तथा वैभववाडीतील वकील ॲड. विवेक गोखले (३४) यांचे सोमवारी मध्यरात्री सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराच्या धक्क्याने आकस्मिक निधन झाले. त्यांच्या निधनाने तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.​ॲड. विवेक गोखले हे गेली काही वर्षे वकिली क्षेत्रात काम करीत आहेत. त्याचसोबत सामाजिक कार्यात सक्रिय होते. महाराष्ट्र ब्राह्मण मंडळ सिंधुदुर्गच्या जिल्हा…

Read Full News

हनुमंत प्रभू यांच्या स्वखर्चातून ज्ञानदीप हायस्कुलचा परिसर स्वच्छ

मालवण दि प्रतिनिधीवायंगणी येथील ज्ञानदीप संस्थेच्या ज्ञानदीप हायस्कुलच्या आवारातील जुनाट झाडाच्या मरगळलेल्या फांद्या व बांडगुळे काढून तसेच नारळाची झाडे व आंबा कलमांच्या सभोवतालची झाडी हटवून परिसर स्वच्छ करण्यात आला. हा संपूर्ण उपक्रम संस्थेचे अध्यक्ष श्री. हनुमंत प्रभू यांनी आपल्या स्वखर्चाने राबविला. शाळेच्या इमारतीवर वानर उड्या मारत असल्याने कौले फुटण्याचे प्रकार घडत होते. यावर उपाय म्हणून…

Read Full News

You cannot copy content of this page