Headlines

राकेश परब यांचे कर्तृत्व प्रेरणादायी व अभिमानास्पद…

जिल्हाप्रमुख दत्ता सामंत:विविध सामाजिक उपक्रमांनी राकेश परब यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न..

⚡सिंधुदुर्ग दि.२४-: मालवण तालुक्यातील चुनवरे गावचे सुपुत्र आणि राज्याचे मत्स्य आणि बंदरे विकासमंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांचे स्विय सहाय्यक राकेश परब यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. वाढदिवसाच्या शुभेच्छांचा मुख्य कार्यक्रम पोईप हायस्कुल सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत म्हणाले, राकेश परब हे आमच्या मालवण तालुक्यातील चुनवरे गावचे सुपुत्र असून पालकमंत्री नितेश राणे साहेब यांचे स्वियसहायक आहेत. त्यांच्या अंगी असलेल्या शांत, संयमी, प्रामाणिक पणा या गुणांनमुळेच ते राणे साहेब यांच्या विश्वासाला पात्र ठरले आहे. राकेश परब यांचा आदर्श सर्वांनी डोळ्यासमोर ठेवून काम केल्यास प्रत्येकजण जीवनात यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. राकेश परब यांचे कर्तृत्व सर्वांना प्रेरणादायी आहे असे गौरवोद्गार दत्ता सामंत यांनी यावेळी काढले. वाढदिवसा निमित्त रक्तदान शिबीर, नारळ लढविणे स्पर्धा , रिक्षा चालकांना रेनकोट वितरण, एसटी स्मार्टकार्ड वितरण, शैक्षणिक साहित्य वाटप आदी विविध उपक्रम आयोजित करण्यात आले होते. नारळ लढविणे स्पर्धेत जिल्हा भरातील युवकांनी सहभाग घेऊन आपल्या हस्तकलेचे प्रदर्शन केले, अंतिम विजेता व उपविजेता यांना रोख रक्कम ५ हजार व ३ हजार रुपये आणि आकर्षक चषक मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत , जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, गुरुनाथ पेडणेकर, अरविंद करलकर, गोपीनाथ पालव, राकेश परब, सौ.राखी परब, वहिवसेना तालुकाध्यक्ष विनायक बाईत, पोईप सरपंच श्रीधर नाईक,माजी सभापती राजेंद्र प्रभुदेसाई, पंकज वर्दम, भाऊ चव्हाण, वेरली सरपंच धनंजय परब, देवेंद्र नाईक, मसदे सरपंच शमिका वाडकर, युवा मोर्चा अध्यक्ष संदीप सावंत, माजी बांधकाम सभापती अनिल कांदळकर, पोईप माजी सरपंच शिवरामपंत पालव, युवराज मेस्त्री, उद्योजक दयानंद प्रभुदेसाई, संतोष मुणगेकर,बाबु परब,आपु आंबेरकर, मोहन पांजरी, रामदास पांजरी, गणेश नेरुरकर,बापु माडये,राजु बेलवलकर,चेतन पांजरी मनिष परब,बाबु आंगणे, दिनेश आंगणे,बाबु वाडकर , कमलेश प्रभू, मुकेश नार्वेकर, सुभाष परब, सचिन आंगणे, दिपक भोगले,राजु परब , पंकज परब, महेश पालव, आणि राकेश परब मित्र मंडळाने सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, प्रमोद कामत गुरुनाथ पेडणेकर अरविंद करलकर, अनिल कांदळकर, यांनी राकेश परब यांच्या यशस्वी कर्तुत्वाला उजाळा देत राकेश परब यांनी या पुढे आपल्या कर्तुत्वाने फार मोठे यशाचे शिखर गाठावे अशा शब्दात शुभेच्छा दिल्या. उपस्थित सर्वांनी राकेश परब आणि सौ. राखी परब यांना शुभेच्छा दिल्या.

You cannot copy content of this page