Headlines

वेंगुर्ला एस. टी. आगारात प्रवाशांसाठी “मोफत वाचनालय” सुविधा…

श्री. प्रसन्ना देसाई:नवनवीन पुस्तके- वर्तमानपत्रे उपलब्धतेचे नवे दालन..

⚡वेंगुर्ला ता.२४-:
वेंगुर्ला एस. टी. आगारात प्रवाशांसाठी मोफत वाचनालय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी विविध संकल्पन्नाद्वारे देशाला प्रगतीपथावर नेत आहेत. त्याचाच भाग म्हणून जिल्ह्यासह वेंगुर्ला तालुक्यातही नवीन दालने उपलब्ध करण्याचा प्रयत्न आहे.लवकरच प्रवाशांसाठी नवनवीन पुस्तकांचा तसेच वर्तमानपत्र उपलब्ध करुन देण्याचे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तथा सेवा शक्ती संघर्ष एस टी कर्मचारी संघ वेंगुर्ला आगार अध्यक्ष प्रसन्ना देसाई यांनी यावेळी
आश्वासन दिले.
यावेळी वेंगुर्ला आगार व्यवस्थापक नवज्योत गावडे , सेवाशक्ती संघर्ष राज्य कार्यकारिणी उपाध्यक्ष तथा विभागीय सचिव भरत चव्हाण, विभागीय सहसचिव स्वप्नील रजपूत, आगार सचिव दाजी तळवणेकर, भाऊ सावळ, विजय कोरे, गौरेश राणे, तेजस जोशी, आशिष खोबरेकर, विजय सोनवणे, अक्षय येसाजी, अनंत पालकर, पी. ए. गावडे, आर पी पालकर,आशिष वराडकर व अन्य कर्मचारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page