सिंधुदुर्गनगरी, दि. २४ : देशाचे संरक्षण मंत्री यांच्या गोवा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर गोवा प्रशासनाच्या विनंतीवरून दि. २६ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इन्सुली चेक पोस्टवरून पत्रादेवी येथे गोवा राज्यात प्रवेश करणाऱ्या अवजड वाहनांना तात्पुरती प्रवेशबंदी करण्यात आली आहे.
दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर वाहतूक व्यवस्था सुरळीत व सुरक्षित ठेवण्यासाठी ही खबरदारीची उपाययोजना करण्यात आली आहे. या कालावधीत नागरिकांनी तसेच वाहनचालकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे. अवजड वाहन चालकांनी या कालावधीत पत्रादेवी मार्गे गोव्याच्या दिशेने प्रवास टाळून पर्यायी मार्गांचा वापर करावा. तसेच पोलीस, वाहतूक पोलीस, परिवहन विभाग आणि संबंधित वाहतूक यंत्रणांनी प्रवेशबंदीची प्रभावी अंमलबजावणी करून वाहतूक कोंडी होणार नाही, यासाठी आवश्यक नियोजन व समन्वय साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
