Headlines

नगरसेविका नीना मुंबरकर व नागरिकांच्या पुढाकारातून आडारी मार्गावरील झाडी हटविली

मालवण दि प्रतिनिधी
मालवण शहरातील देऊळवाडा– आडारी मार्गालगत वाढलेल्या दाट झाडीमुळे वाहतुकीस होत असलेला अडथळा लक्षात मालवणच्या नगरसेविका नीना मुंबरकर यांनी पुढाकार घेत सोमवारी सकाळी नगरपरिषदेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांसह जेसीबीच्या सहाय्याने आणि स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने ही झाडी हटविण्यात आली

देऊळवाडा– आडारी मार्गालगत वाढलेल्या दाट झाडीमुळे वाहतुकीस होत असलेला अडथळा होत होता तर झाडांच्या फांद्या व वेली वीज वाहिन्यांना घासत असल्याने आडारी परिसरातील खंडित होत असलेला वीजपुरवठा याबाबत स्थानिक नागरिकांनी वीज वितरण कंपनीकडे वीज वाहिन्यांवरील झाडी हटविण्याची मागणी केली होती. मात्र, या मागणीकडे दुर्लक्ष झाल्याने अखेर स्थानिक नागरिकांनी नगरसेविका नीना मुंबरकर यांच्याकडे हा प्रश्न मांडला.
नागरिकांची अडचण लक्षात घेऊन नगरसेविका नीना मुंबरकर यांनी पुढाकार घेत नगरपरिषदेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांसह जेसीबीच्या सहाय्याने आणि स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने देऊळवाडा–आडारी मार्गावरील वाहतुकीस अडथळा ठरणारी झाडी हटविण्याची मोहीम हाती घेतली.

या मोहिमेमुळे रस्त्यालगतची दाट झाडी हटविण्यात आली असून वीज वाहिन्यांना वेलींचा पडलेला वेढाही दूर झाला आहे. त्यामुळे वाहतुकीचा मार्ग मोकळा झाला असून वीज वाहिन्यांवरील झाडीचा अडथळा दूर झाल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

या कामात नगरपरिषद स्वच्छता मुकादम वळंजू यांच्यासह सफाई कर्मचारी तसेच मोहन फाटक, मुन्ना फाटक, बाळू फाटक, समीर फाटक, निलेश शिरोडकर, संदीप गावकर, मिलिंद फाटक, विद्याधर फाटक, संजय गावकर, अक्षय नाटेकर, हरी भोजणे, आदित्य चव्हाण आदी स्थानिक नागरिक सहभागी झाले होते.

You cannot copy content of this page