बांदा/प्रतिनिधी
येथील नट वाचनालयात डॉ. संजय काशीनाथ बर्वे पुरस्कृत त्याची आई (कै.) शोभना काशीनाथ बर्वे यांच्या स्मरणार्थ शालेय मुलांसाठी मनाचे श्लोक स्पर्धेचे आयोजन शनिवार दिनांक २४ रोजी सकाळी १० वाजता वाचनालयात करण्यात आले आहे. ही स्पर्धा सावंतवाडी व दोडामार्ग तालुका मर्यादित असून इयत्ता ५ वी ते ७ वी या शालेय गटात होणार आहे. एका शाळेतील 3 स्पर्धक सहभागी होवू शकतील. विजेत्याना रोख रक्कम व प्रमाणपत्र देण्यात येईल. संबंधित शाळानी स्पर्धक मुलांची नावे ग्रंथपाल नट वाचनालय यांच्याकड़े द्यावीत. स्पर्धकांनी मनाचे श्लोक न बघता कोणतेही पाच म्हणणे आवश्यक आहेत.

