वैभववाडी प्रतिनिधी
महाराष्ट्र ब्राह्मण मंडळ सिंधुदुर्गचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य तथा वैभववाडीतील वकील ॲड. विवेक गोखले (३४) यांचे सोमवारी मध्यरात्री सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराच्या धक्क्याने आकस्मिक निधन झाले. त्यांच्या निधनाने तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
ॲड. विवेक गोखले हे गेली काही वर्षे वकिली क्षेत्रात काम करीत आहेत. त्याचसोबत सामाजिक कार्यात सक्रिय होते. महाराष्ट्र ब्राह्मण मंडळ सिंधुदुर्गच्या जिल्हा कार्यकारिणीवर ते सदस्य म्हणून कार्यरत होते. आपल्या मनमिळावू स्वभावामुळे त्यांनी विविध क्षेत्रांतील नागरिकांमध्ये आपुलकीचे संबंध निर्माण केले होते.
त्यांच्या अकाली निधनाने कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार आणि परिचितामधून हळहळ व्यक्त होत आहे. ॲड. गोखले यांच्या पार्थिवावर आज दुपारी नाधवडे-व्हेळकरवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
वैभववाडीतील युवा वकील ॲड. विवेक गोखले यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन…
