मालवण दि प्रतिनिधी
वायंगणी येथील ज्ञानदीप संस्थेच्या ज्ञानदीप हायस्कुलच्या आवारातील जुनाट झाडाच्या मरगळलेल्या फांद्या व बांडगुळे काढून तसेच नारळाची झाडे व आंबा कलमांच्या सभोवतालची झाडी हटवून परिसर स्वच्छ करण्यात आला. हा संपूर्ण उपक्रम संस्थेचे अध्यक्ष श्री. हनुमंत प्रभू यांनी आपल्या स्वखर्चाने राबविला.
शाळेच्या इमारतीवर वानर उड्या मारत असल्याने कौले फुटण्याचे प्रकार घडत होते. यावर उपाय म्हणून झाडाच्या काही किरकोळ फांद्या छाटून इमारतीचे संरक्षण करण्यात आले. तसेच फुटलेली कौलेही लावून घेण्यात आली.
या स्वच्छता व देखभाल कामाच्या वेळी शालेय समितीचे अध्यक्ष श्री. बाबू हडकर आणि मुख्याध्यापक श्री. टकले उपस्थित होते. संस्थेच्या परिसराची स्वच्छता, सुरक्षितता आणि शाळेच्या इमारतीच्या संरक्षणासाठी स्वखर्चाने पुढाकार घेतल्याबद्दल श्री. हनुमंत प्रभू यांचे उपस्थितांनी आभार मानले.
