Headlines

‘वने राहिली तरच जीवन समृद्ध होईल’…

वनसंरक्षणासाठी विद्यार्थ्यांना आवाहन..

⚡मालवण ता.०८-:
विकासाच्या नावाखाली आपणच आजपर्यंत वनांचा ऱ्हास करत गेलो. म्हणूनच आज दुष्काळासारखी परिस्थिती आपल्यावर ओढवली आहे. पाणी टंचाई निर्माण झाली. त्यामुळे वनाचे संरक्षण करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे याची जाणीव ठेवून सर्वांनी योगदान दिले पाहिजे असे प्रतिपादन मालवणचे वनरक्षक श्री अतुल खोत यांनी येथे बोलताना केले

कट्टा येथील वराडकर हायस्कुल येथे वन्यजीव सप्ताहानिमित्ताने वनविभाग सावंतवाडी आणि सामाजिक वनीकरण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने वन, जल यांच्या संवर्धनासाठी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने दशावतार नाट्यातून प्रबोधनात्मक कार्यक्रम या कार्यक्रमात हेरंब दशावतारी नाट्य मंडळ सिंधुदुर्ग यांच्या वतीने वनसंरक्षण, पाणी संरक्षण यावर विद्यार्थ्यांसमोर दशावतारी नाटक सादर करण्यात आले यावेळी कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ कट्टाचे सचिव सुनील नाईक, शालेय समितीचे अध्यक्ष सुधीर वराडकर, मुख्याध्यापिका सौ देवयानी गावडे, वनपाल सदानंद परब, सामाजिक वनीकरण विभाग कट्ट्याचे वनपाल श्री पिळणकर तसेच वनपाल श्री वसावे, सहाय्यक शिक्षक समीर चांदरकर, भूषण गावडे व इतर उपस्थित होते

प्रारंभी सौ गावडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर श्री चांदरकर यांनी प्रास्ताविक केले

यावेळी श्री खोत यांनी वने राहिली तरच आपले जीवन समृद्ध होणार आहे. विद्यार्थ्यांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनी निसर्गासाठी योगदान दिले पाहिजे. वनांचे संरक्षण ही आपली जबाबदारी आहे. आणि ती सर्वांनी पार पाडावी असे आवाहन केले

You cannot copy content of this page