Headlines

गणेश – येशू मंदिराचा वर्धापन दिन सोहळा १४ व १५ रोजी

मालवण : (प्रतिनिधी)

मालवण गवंडीवाडा येथील श्री गणेश येशू मंदिराचा २१ वा वर्धापन सोहळा विविध धार्मिक कार्यक्रमांनी दि. १४ ते १६ ऑक्टोबर या कालावधीत उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.

या सोहळ्याची सुरुवात बुधवार १४ ऑक्टोबर रोजी लघुरुद्राने होणार आहे. गुरुवार दि. १५ रोजी सकाळी ११ वाजता श्री सत्यनारायण महापूजा, सायंकाळी ७ वाजता संगीत भजन, रात्री ८ वाजता येशूपूजा (तेस) आयोजित करण्यात आली आहे. शुक्रवार, १६ रोजी सकाळी ४ वाजता काकड आरती, दुपारी १ वाजता ब्राह्मण भोजनाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page