संजू परब यांचा सवाल: तर येणाऱ्या काळात आरोग्य विभागातील मोठा भ्रष्टाचार बाहेर काढू..

⚡सावंतवाडी ता. ९-: दोन दिवसांपूर्वीच राजीनामा घेतला असताना त्यावेळी गप्प का होता, असा सवाल माजी नगराध्यक्ष आता नगरसेवक संजू परब यांनी उपस्थित केला. सभात्याग केल्यानंतर आता राजीनामा घेतला आहे ,त्यामुळे मी त्यांच आता अभिनंदन करतो अशी माहिती संजू परब यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दरम्यान, काही बिलांवर नगराध्यक्षांच्या स्वाक्षऱ्या असताना त्या बिलांकडे लक्ष दिले जात नाही का, ..?असा सवाल अॅड. निता सावंत-कविटकर यांनी उपस्थित केला. प्रशासनाचा अभ्यास नसेल तर नगराध्यक्षांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.
यावेळी संजू परब यांनी नगरपालिकेच्या आरोग्य विभागातील कथित गैरव्यवहाराचा मुद्दाही उपस्थित केला. सुमारे ९ लाख रुपये किमतीच्या मशीनचे बिल तब्बल २२ लाख रुपये काढण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. आरोग्य विभागातील हा कथित भ्रष्टाचार येत्या काळात पुराव्यांसह बाहेर काढू, असा इशाराही परब यांनी दिला.
