Headlines

Global Maharashtra Breaking News

परब मराठा समाजातर्फे मुंबईत महिला दिन सोहळा…

⚡मालवण ता.०५-:परब मराठा समाज मुंबई या संस्थेच्या महिला विभागाच्या वतीने ज्ञाती भगिनींचा “जागतिक महिला दिन” सोहळा शनिवार दि.१५ मार्च रोजी सायंकाळी ५ ते १० या कालावधीत महाजनवाडी, भावसार सभागृह, परेल (पुर्व), मुंबई येथे साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त महिलांसाठी विविध कार्यक्रम व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त हळदी कुंकू समारंभ व पाककला स्पर्धा होणार…

Read More

ठाकरे शिवसेना मालवण तालुका कार्यकारिणीची उद्या बैठक…

⚡मालवण ता.०५-: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मालवण तालुका कार्यकारिणीची बैठक गुरुवार दि. ६ रोजी सकाळी १०.३० वाजता मालवण शहरातील लीलांजली हॉल येथे होणार आहे. यावेळी माजी आमदार वैभव नाईक, माजी आमदार परशुराम उपरकर, कणकवली विधानसभा मतदारसंघ प्रमुख सतीश सावंत, माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, कुडाळ विधानसभा मतदारसंघ प्रमुख संग्राम प्रभुगावकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे….

Read More

संत राऊळ महाराज महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा…

डॉ सी.व्ही.रामन यांच्या संशोधन कार्याला उजाळा:दोन दिवस विविध कार्यक्रम आणि स्पर्धांचे आयोजन.. ⚡कुडाळ ता.०५-: येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभाग आणि सायन्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून अभिनव असा ऑल केम – २५ कार्यक्रम नुकताच झाला. राष्ट्रीय विज्ञान दिना निमित्त दोन दिवस विविध कार्यक्रम,स्पर्धा घेण्यात आल्या. विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांचा…

Read More

उद्या कलमठ ग्रामपंचायत मध्ये तहसील कार्यालय व ग्रामपंचायतच्या वतीने भूमिहीन दाखल्यांचे शिबिर…

घरकूलच्या भूमिहीन लाभार्थ्यांनी उपस्थित राहण्याचे सरपंच संदिप मेस्त्री यांचे आवाहन.. ⚡कणकवली ता.०५-: तहसील कार्यालय व ग्रामपंचायत कलमठ यांच्या संयुक्त विद्यमाने कलमठ ग्रामपंचायत सभागृहात भूमिहीन दाखल्यांसाठी खास शिबिराचे आयोजन केले आहे. कलमठ गावात ४५ घरकुल लाभार्थींना घरे मंजूर झाले असून भूमिहीन असलेल्या लाभार्थ्यांना भूमिहीन दाखला सुलभतेने मिळवून देण्यासाठी ग्रामपंचायत कलमठ येथे भूमिहीन दाखल्यांचे शिबिर आयोजित केले…

Read More

नगरसेवक रोहन खेडेकर भाजपात दाखल…

नगरसेवक रोहन खेडेकर भाजपात दाखल.. ⚡देवगड ता.०४-: देवगड-जामसंडे नगरपंचायतीतील शिवसेनेचे नगरसेवक रोहन खेडेकर यांनी नामदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपामध्ये प्रवेश केला आहे. रोहन खेडेकर वार्ड क्रमांक सातमधून निवडून आले. त्यावेळी ते उभाठा सेनेमध्ये होते. त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. अखेर मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी…

Read More

श्री सद्गुरू समर्थ साटम महाराजांच्या हिंदी अनुवादित चरित्राचे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन…

⚡सावंतवाडी ता.०५-: शिर्डीच्या साईबाबांना समकालीन असलेले कोकणातील संतांचे संत शिरोमणी दाणोली नगरीचे श्री सद्गुरू समर्थ साटम महाराज यांच्या मराठी चरित्राच्या हिंदीत अनुवाद केलेल्या पुस्तकाचे प्रकाशन मंगळवारी सकाळी दाणोली येथील साटम महाराज समाधी मंदिरात मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.लेखक र. ग. वायंगणकर यांनी साटम महाराज यांचे चरित्र पुस्तक रूपात लिहिले आहे. समस्त साटम महाराज भक्त परिवारामध्ये ते…

Read More

युवा रक्तदाता संघटनेमुळे गोव्यातील रुग्णाला मिळाले जीवदान…

सावंतवाडी: गोवा बांबोळी येथील रुग्णाला बायपास सर्जरी दरम्यान बी पॉझिटिव्ह या रक्तगटाच्या रक्ताची तातडीने आवश्यकता होती. यावेळी युवा रक्तदात्यांनी रक्तपेढीत जाऊन रक्तदान केले. यामुळे रूग्णाला जीवदान मिळाले आहे. सावंतवाडी येथून मयूर गावडे, प्रथमेश सुकी, तौसिफ शेख, शुभम धारगळकर या युवा रक्तदात्यांनी गोवा बांबोळी रक्तपेढीमध्ये जाऊन रक्तदान केले. यासाठी युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांनी…

Read More

‘आर्चरी’मध्ये‌ सिंधुकन्येची विजयी घोडदौड सुरूच…

अक्सा शिरगांवकर हिची राज्यस्तरीय स्पर्धेत तीन ‘सिल्व्हर मेडल्स’ना गवसणी:डेरवण येथे पार पडली स्पर्धा.. ⚡कणकवली ता.०६-: धनुर्विद्या (आर्चरी) प्रकारात गेल्या दोन वर्षांपासून अनेक राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्पर्धांमध्ये ‘मेडल्स’ना गवसणी घालणाऱ्या कणकवली येथील अक्सा मुदस्सर शिरगांवकर या १२ वर्षीय सिंधुकन्येने आता आणखी एका राज्यस्तरीय स्पर्धेत ‘सिल्व्हर मेडल्स’ना गवसणी घातली आहे. महाराष्ट्र आर्चरी असोसिएशन यांच्यातर्फे डेरवण (ता. चिपळूण, जि….

Read More

अखिल भारतीय मराठा महासंघ यांच्या वतीने ८, ९ व १० रोजी कमर्शियल व्हेईकल एक्सपो २०२५ चे आयोजन…

अभिषेक सावंत:सर्व संबंधितांनी सहभागी होवून व्यावसायिक वाहने खरेदी करण्यासाठी पुढाकार घ्यावा.. ⚡सावंतवाडी ता.०५-: अखिल भारतीय मराठा महासंघ सिंधुदुर्ग यांच्या वतीने ८, ९ व १० मार्च रोजी कमर्शियल व्हेईकल एक्सपो २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे. मराठा व ओबीसी व्यावसायिक वाहनधारकांसाठी ही रोजगाराची संधी असून या एक्सपोच्या माध्यमातून बिना व्याज व्यावसायिक वाहन खरेदी करण्याची सुवर्णसंधी असल्याची…

Read More

चर्मकार समाज मंडळाच्या वतीने निबंध स्पर्धेचे आयोजन…

⚡कणकवली ता.०५-: सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाचा वर्धापन दिन व संत शिरोमणी गुरू रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त मंडळाच्यावतीने जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा शालेय, महाविद्यालयीन, खुला अशा गटांमध्ये होणार आहे. शालेय गट-इ. ५ ते १० वीसाठी संत रविदास महाराज यांचा जीवनपट हा विषय असून शब्द मयार्दा ५०० आहे. महाविद्यालयीन गट-युवा गट-…

Read More
You cannot copy content of this page