भजन कलेचे जतन आणि संवर्धन कशी होईल याचा विचार होणे गरजेचे….

डॉ दीपक परब:मसुरे मर्डे सभागृहात भजनी कलाकारांच्या उपस्थितीत बैठक संपन्न..

⚡मालवण ता.२१-: भजन गणपती पुरते मर्यादित राहू नये तर संत परंपरेतील ही भजन कलेचे जतन आणि संवर्धन करतानाच ती अधिकाधिक वृद्धिंगत कशी होईल याचा विचार होणे गरजेचे आहे आज 20-20 डबलबारी भजनामध्ये काही ठिकाणी चुकीचे प्रकार होत आहेत. याला आळा बसला पाहिजे. बोलून मनोरंजन करण्यापेक्षा पारंपरिक भजनातून आत्मिक समाधान मिळवा असे प्रतिपादन चांदेरचे सुपुत्र आणि उद्योजक डॉ दीपक परब यांनी येथे बोलताना केले

मसुरे येथील भरतगड इंग्लिश मीडियम स्कूल मसुरे मर्डे सभागृहात भजनी कलाकार संस्था सिंधुदुर्गच्या वतीने मालवण तालुकास्तरीय कार्यशाळा संस्था अध्यक्ष संतोष कानडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली त्यावेळी श्री परब हे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कामगार नेते प्रकाश परब, कलाकार मानधन समिती सदस्य अजिंक्य पाताडे, सचिव गोपीनाथ लाड, वैभव खानोलकर, सदानंद कसालकर, संतोष मिराशी, योगेश सामंत, तुळशीदास बागवे, संतोष पाताडे, संतोष मसुरकर, मकरंद सावंत, दाजी बांदकर, संजय चव्हाण, बाबाजी भोगले, महेश पालव,सतीश रावराणे, नामदेव गिरकर, पंढरीनाथ मसूरकर, राजेश गावकर आदी उपस्थित होते. प्रारंभी समितीचे सचिव गोपीनाथ लाड बुवा यांनी प्रास्ताविक केले.

यावेळी बोलताना डॉ दीपक परब यांनी भजन ही पारंपारिक कला जोपासण्यासाठी लवकरच मसूरे गावात भव्य असा भजन महोत्सव आयोजित करण्यात येईल. भजन कला टिकून राहण्यासाठी मुंबई आणि जिल्ह्यामध्ये सुद्धा सर्व ते सहकार्य माझ्या कडून मिळेल असे सांगितले

कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री संतोष कानडे यांनी भजनी कलाकारांना न्याय मिळणे तसेच भजन कला अधिक संपन्न व्हावी, वारसा टिकून रहावा यासाठी या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. भजन कलाकारांना शासन स्तरावर न्याय मिळवून देण्यात येईल. भजनी कलाकारांनी एकत्र येणे आवश्यक आहे. जिल्ह्यात भजन सदन होण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांच्या कडे मागणी करण्यात आली आहे. भजनी कलाकारांना पंढरपूर पर्यंत पायीचे आयोजन करण्यात आले होते. २०-२० डबलबारी भजन बुवांना सुद्धा एकत्र करून काम करण्यात येणार आहे. मालवण तालुका कलाकारांची खाण आहे. प्रत्येक कलाकाराने संस्थेचा सभासद होऊन शासनाच्या योजनाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.

ज्येष्ठ कामगार नेते आणि मुंबई येथे भजन महोत्सव आयोजित करणारे प्रकाश परब यांनी भजन ही कला परमेश्वराच्या जवळ नेणारी कला आहे. या संस्थेला भजन रुपी जी काही सेवा यापुढे करायचे असेल त्यासाठी येथील सभागृह आणि जे लागेल ते सहकार्य करू असे सांगितले यावेळी मालवण तालुका पत्रकार समिती अध्यक्ष पदी निवड झाल्या बद्दल पत्रकार दत्तप्रसाद पेडणेकर तसेच उद्योजक डॉ. दीपक परब बाबाजी भोगले,मसुरे देवस्थानचे प्रमुख मानकरी राजू प्रभूगावकर यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी अशोक बागवे, महेश हडकर, बाबुराव गोलतकर, आबा तुरी, हिरबा तोंडवळकर, पपू मुळीक, विशू तोंडवळकर, सचिन कातवणकर, गणेश चव्हाण, श्री रुपेश परब, प्रफुल्ल हडकर, स्वप्निल ठाकूर महेश हडकर, बाबुराव गोलतकर लक्ष्मण बागवे सुदर्शन फोपे, कृष्णा बांदकर सदानंद पाटील तुकाराम कांदळकर संजय बानकर आबा तुरी महेश पालव संजय माने लक्ष्मण शिंगरे प्रकाश करंजेकर, मनीष बागवे तसेच मालवण तालुक्यातील भजनी बुवा, कलाकार बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाबू आंगणे यांनी केले.

You cannot copy content of this page