उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे आयोजन..
⚡मालवण ता.१६-:
शिवजयंती उत्सवाचे औचित्य साधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखा चिंदर यांच्यावतीने शुक्रवार २० फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत चिंदर गावठणवाडी सातेरी मंदिर नजीक, मिलिंद चिंदरकर यांच्या घरी मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे .
या शिबिरात मोफत नामवंत तज्ञांकडून कॉम्प्युटराइज्ड नेत्र तपासणी या शिबिरात करण्यात येणार आहे. तसेच माफक दरात चष्मे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन आचरा विभाग प्रमुख समीर लब्दे यांनी केले आहे .
