दोडामार्ग मध्ये परीक्षा काळात वीजपुरवठा खंडित करू नका…

बाबुराव धुरी:अन्यथा आंदोलन छेडू..

⚡दोडामार्ग ता.१६-:
दहावी-बारावीच्या परीक्षा सुरू असताना वीजपुरवठा खंडित करू नये, अशी मागणी ठाकरे सेना जिल्हाध्यक्ष बाबूराव धुरी यांनी केली आहे.
आर्थिक वर्षाच्या कारणावरून थकीत बिल असल्यास ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केला जात असल्याचा आरोप त्यांनी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी वर केला आहे. परीक्षा काळात वीज खंडित झाल्यास विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होतो, त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीजपुरवठा बंद करू नये, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला.
ही मागणी दोडामार्ग तालुक्यातील नागरिकांनीही समर्थन केली आहे.

You cannot copy content of this page