पाच ते सहा हजार नागरिकांच्या सहभागाचे नियोजन: भाजप जनसंपर्क कार्यालयात बैठक संपन्न..
⚡सावंतवाडी, ता.०१-: केंद्र शासनाच्या ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात १० ऑगस्ट रोजी भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर सावंतवाडी येथील भाजपा जनसंपर्क कार्यालयात अभियानाच्या संघटनात्मक नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले. बैठकीत यात्रेचे नियोजन, विविध जबाबदाऱ्यांचे वाटप आणि व्यापक जनसहभागाबाबत चर्चा करण्यात आली.
जिल्हा संयोजक संदीप गावडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस महाराष्ट्र भाजपा युवानेते विशाल परब, सावंतवाडी नगरपरिषद उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, वेंगुर्ला नगराध्यक्ष दिलीप गिरप तसेच भाजपा महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी बोलताना संदीप गावडे यांनी, “सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील ‘हर घर तिरंगा’ यात्रा ही अभूतपूर्व ठरेल. घराघरात तिरंगा आणि मनामनात राष्ट्रभक्ती जागविण्याचा हा उपक्रम असून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,” असे आवाहन केले.
ही तिरंगा यात्रा सोमवार, १० ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता सावंतवाडी येथील श्री देव उपरलकर मंदिर परिसरातून प्रारंभ होणार आहे. यात्रेत सुमारे पाच ते सहा हजार नागरिक सहभागी होतील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.
बैठकीस वेंगुर्ला उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, सावंतवाडी पंचायत समिती उपसभापती गौरव मुळीक, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, रंगनाथ गवस, सुधीर आडिवरेकर, संतोष राऊळ, मधुकर देसाई, दीपक गवस, विष्णू परब, मोहिनी मडगावकर, हितेन नाईक, दीपाली भालेकर, प्रतिक बांदेकर, सुकन्या टोपले, सिद्धेश महाजन, अष्टविनायक धाऊसकर, सचिन शेट्ये, अंकुश नाईक, सुनील गवस, विनेश तावडे, दादा परब, सागर ढोकरे, सुनीता पेडणेकर, दुलारी रांगणेकर, नीलम नाईक, विनय नेरुरकर, गौरी माईणकर, गौरी मराठे, पुंडलीक कदम, ड्युमिंग आल्मेडा, संतोष तळवणेकर, धिरेंद्र म्हापसेकर, केतन आजगांवकर, शिवा गावडे, केदार म्हसकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
