दिवाबत्ती दुरुस्ती करून दिल्याबद्दल मुस्लिमवाडीतील ग्रामस्थांनी अर्णव स्वार यांचे मानले आभार…

⚡बांदा ता.१६-: गेले सुमारे एक वर्ष मुस्लिमवाडी परिसरात काही कारणांमुळे दिवाबत्तीचा पुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे संपूर्ण परिसरातील नागरिकांना रात्रीच्या वेळी मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. अंधारामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती. दरम्यान युवा नेतृत्व अर्णव स्वार हे मुस्लिमवाडी येथे एका कार्यक्रमानिमित्त रात्रीच्या वेळी आले असता त्यांना परिसरात दिवाबत्तीचा अभाव जाणवला. हा प्रश्न लक्षात येताच त्यांनी तातडीने स्वतःच्या स्वखर्चातून दिवाबत्ती दुरुस्तीचे काम हाती घेतले. विशेष म्हणजे त्यांनी स्वतः त्या ठिकाणी उपस्थित राहून वायरमन बाबू आरोसकर यांच्या सहाय्याने खंडित झालेल्या दिवाबत्तीचे काम पूर्ण करून घेतले.
या तत्परतेमुळे मुस्लिमवाडीतील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून अर्णव स्वार यांच्या या सामाजिक कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांच्या कार्याची पोचपावती म्हणून मुस्लिमवाडी वासीयांकडून त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.
यावेळी नवाज खान, रिजवान खान, सोहेल जमादार, सोहेल खान, यूसुफ आगा, सिराज आगा, रेहान शेख, साहिल खान, कैफ मुजावर, साहिल जमादार, आदनान खतीब, फरदीन खतीब, सिकंदर जमादार, शब्बीर खान, निसार शेख आदी उपस्थित होते.
फोटो:-
बांदा मुस्लिमवाडी येथे अर्णव स्वार यांचे पुष्पगुच्छ देऊन आभार व्यक्त करताना ग्रामस्थ.

You cannot copy content of this page