⚡बांदा ता.१६-: जागतिक महिला दिनानिमित्त क्रिएटिव्ह सखी ग्रुप, बांदा यांच्या वतीने “स्वयंसिद्धा मी” हा आत्मनिर्भर स्त्रीशक्तीचा उत्सव आयोजित करण्यात आला आहे. विठ्ठल मंदिर हॉल, गांधी चौक येथे दिनांक ७ व ८ मार्च रोजी हा दोन दिवसांचा महोत्सव संपन्न होणार आहे.
या महोत्सवात महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी खाद्य जत्रा भरवण्यात येणार असून, सौंदर्य प्रसाधने, वस्त्र प्रावरणे तसेच गृहपयोगी विविध वस्तूंच्या विक्रीसाठी स्टॉल्स लावण्यात येणार आहेत.
दरम्यान, “स्वयंसिद्धा मी” महोत्सवासाठी फूड स्टॉल व वस्तू विक्री स्टॉलचे बुकिंग सुरू झाले आहे. इच्छुक महिलांनी वेळेत संपर्क साधून स्टॉल बुकिंग करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. स्टॉल बुकिंगची अंतिम तारीख २५ फेब्रुवारी असल्याचेही कळवण्यात आले आहे.
महोत्सवात विशेष आकर्षण म्हणून ७ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता “खेळ पैठणीचा” हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात सहभागी महिलांना आकर्षक भेटवस्तू जिंकण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे. तसेच ८ मार्च रोजी महिलांसाठी पारंपारिक वेशभूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत महिलांनी भारतीय संस्कृती दर्शवणारी कोणतीही पारंपरिक वेशभूषा परिधान करून सहभागी व्हायचे आहे. स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम बक्षीस २५०० रुपये, द्वितीय बक्षीस २००० रुपये व तृतीय बक्षीस १५०० रुपये देण्यात येणार आहे.
स्टॉल बुकिंगसाठी संपर्क :
9421148814 / 7397887373 / 9923869205 / 7385336014
स्पर्धा नोंदणीसाठी संपर्क :
9371125733 / 9404457292 / 9657121133 / 9404448339 / 9422079515
या उपक्रमाला महिला बचतगट, उद्योजिका व स्थानिक महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
बांद्यात जागतिक महिला दिनानिमित्त ‘स्वयंसिद्धा मी’ स्त्रीशक्ती महोत्सवाचे आयोजन…
