सातार्डा महात्मा गांधी प्री – प्रायमरी स्कूल चे स्नेहसंमेलन उत्साहात…

⚡सावंतवाडी ता.१६-: सातार्डा येथील महात्मा गांधी प्री – प्रायमरी स्कूल चे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले.यावेळी शाळेची प्रगती समाधानकारक असून शाळेसाठी लागणारे सहकार्य आपण करणार असल्याचे सांगतानाच, ॲड .प्रसाद आसोलकर यांनी शिक्षकांच्या पगारासाठी पुढाकार घेतल्याने ते कौतुकास पात्र असल्याचे नवनिर्वाचित जि.प.सदस्य सुदन कवठणकर यांनी बोलताना सांगितले.

कार्यक्रमाची सुरुवात स्वागतगीताने, मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने तसेच उपस्थितांचे गुलाब पुष्प देऊन स्वागताने करण्यात आली.
कार्यक्रमाचे उदघाटन विकासक निलेश ठाकूर यांच्याहस्ते करण्यात आले.
यावेळी नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य उदय पारिपत्ये,सातोसे सरपंच प्रतीक्षा मांजरेकर, सातार्डे मध्यवर्ती संघाचे अध्यक्ष अनिल तळवणेकर,महात्मा गांधी प्री – प्रायमरी स्कूल कमिटीचे अध्यक्ष ॲड. प्रसाद आसोलकर,स्कूल व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष राजन हळदणकर, बाळू बर्डे, विकासक भोजनाथ गावडे, महात्मा गांधी हायस्कूलचे मुख्याध्यापक प्रशांत सावंत, प्री प्रायमरी स्कूलच्या मुख्याध्यापिका संज्योती पेडणेकर व्यासपीठावर उपस्थित होते.
पं. स. सदस्य उदय पारिपत्ये, माजी अध्यक्ष बाळू बर्डे, विकासक निलेश ठाकूर यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
जि .प .सदस्य सुदन कवठणकर यांना विकासक निलेश ठाकूर व पं स सदस्य उदय पारिपत्ये यांना स्कूल कमिटी अध्यक्ष ॲड.प्रसाद आसोलकर यांनी शाल श्रीफळ देऊन सन्मानित केले. प्री प्रायमरी स्कूलच्या परीक्षेत, खेळामध्ये यश प्राप्त केलेल्या मुलांना प्रशस्ती पत्रक, भेट वस्तू देऊन मान्यवरांच्याहस्ते गौरविण्यात आले. मुलांनी सादर केलेल्या विविध गुणदर्शन कार्यक्रमाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मान्यवरांचे स्वागत तुळशीदास मयेकर यांनी केले. शिक्षिका शेफाली राऊळ यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.आभार मुख्याध्यापिका संज्योती पेडणेकर यांनी मानले.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी योगेश गोवेकर, संदीप पेडणेकर,नीता परब,संज्ञा नाईक, ममता नागवेकर, कला कवठणकर, शेफाली राऊळ सौ. पारिपत्ये,शाळेचे कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले

You cannot copy content of this page