⚡वैभववाडी ता.१६-: आनंदीबाई रावराणे महाविद्यालय वैभववाडी येथे रसायनशास्त्र विभागअंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 17 व 18 फेब्रुवारी रोजी आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेचे उद्घाटन मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य लखमराजे भोसले यांच्या हस्ते होणार असून या कार्यक्रमाला महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष सदानंद रावराणे उपस्थित राहणार आहेत.. या परिषदेत एकूण आठ वक्ते मार्गदर्शन करणार असून यातील दोन वक्ते हे बाहेरच्या देशातील आहेत. वैभववाडी सारख्या ग्रामीण भागात अशा प्रकारची आंतरराष्ट्रीय परिषद होणे ही या विभागातील प्राध्यापक, विद्यार्थी यांच्यासाठी सुसंधी आहे. अशी माहिती महाविद्यालयाचे रसायनशास्त्र विभागप्रमुख प्रा डी. एम.शिरसट यांनी दिली आहे.
आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत शिरसाट बोलत होते यावेळी प्राचार्य नामदेव गवळी अधीक्षक संजय रावराणे,उदय रावराणे, प्रा.डॉ. के. एस पाखरे,डॉ. एम एस कर्पे,प्रा. डॉ. व्ही. बी गोपूला आदी आदी उपस्थित होते
यावेळी बोलताना शिरसट पुढे म्हणाले, आमच्या महाविद्यालयाला दोन वर्षांपूर्वी संस्थेचे अध्यक्ष विनोद तावडे यांच्या प्रेरणेतून, व प्रयत्नातून प्रधानमंत्री उच्च स्तर शिक्षा अभियान अंतर्गत पाच कोटीचे रुपयाचे अनुदान मिळाले आहे. या अनुदानातून महाविद्यालय बांधकाम, दुरुस्ती,साहित्य खरेदी व उपक्रम यासाठी हा निधी खर्च करावयाचा आहे. गेल्या वर्षी आपण राष्ट्रीय स्तरावरील दोन दिवसीय परिषद घेऊन ती यशस्वी केली होती. यावर्षी या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत एकूण आठ वक्ते मार्गदर्शन करणार आहेत. यामध्ये दोन वक्ते हे परदेशातील आहेत. यामध्ये मिलान इटली येथील प्रा. डॉ. जियानवितो विलें, अमेरिकन युनिव्हर्सिटी ऑफ नायजेरिया येथील प्रा. डॉ. अदेबायो आयझॅक ओलोशो तर असतील तर अन्य सहा वक्ते हे देशातील नामांकित संशोधन संस्थेतून संशोधन पूर्ण करणारे ज्येष्ठ शास्त्रज्ञ आहेत. यामध्ये सी एस आय आर नॅशनल केमिकल लॅब्रॅरिटी पुणे प्रा डॉ प्रकाश वडगावकर, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर रसायनशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. एस एस राशीमकर, अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठ येथील डॉ. प्रा. एस आर पुजारी, शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर येथील डॉ. प्रा. व्ही. बी सत्ताल, मुंबई येथील वीर वाजे सायन्स, कॉमर्स कॉलेजचे डॉ.प्रा.सी एस गुंड, मुंबई येथील इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी प्रा.डॉ. अर्चना कालेकर,
आदी रसायन शात्रातील तज्ज्ञ, शास्त्रज्ञ सहभागी होणार आहेत.
या आंतरराष्ट्रीय परिषदेत देशभरातून विविध महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी सहभागी होत आहेत. आत्तापर्यंत 200 पेक्षा जास्त लोकांनी सहभाग नोंदवला आहे. यामध्ये मूळ भारतातील असलेले व सध्या परदेशात शिक्षण घेत असलेल्या तीन विद्यार्थ्यांचा समावेश आहे. असेही शिरसट यांनी सांगितले.
वैभववाडीत १७-१८ फेब्रुवारीला आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र परिषद…
